आयरिश मॅनची घातक फलंदाजी; षटकार खेचून फोडली स्वतःच्याच कारची काच (Video)

सुशांत जाधव
Friday, 28 August 2020

गल्ली क्रिकेटमध्ये चेंडू-फळीच्या रंगलेल्या डावात  शेजा-पाजाऱ्यांच्या काचा फोडण्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. आयरिश गड्याने स्थानिक सामन्यात गाड्यांची काच फोडल्याचे पाहायला मिळाले. त्याने लगावलेल्या फटक्याने त्याच्यात कारची काच फुटली. 

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा क्रिडा चाहत्यांना फलंदाजाच्या भात्यातून अनोख्या  फटकेबाजी आतषबाजी पाहायला मिळते. टी-20 सामना हा क्रिडा रसिकांचा आनंद द्विगुणित करणारा एक सोहळाच असतो. झटपट क्रिकेटच्या मैदानात  काही फलंदाज आपल्या ताकदीच्या जोरावर अशक्यप्राय फटकेबाजी करुन लक्षवेधून घेतात. आयर्लंडच्या खेळाडू अशाच प्रकारच्या उत्तुंग फटकेबाजीमुळे चर्चेत आलाय. आयरिश गड्याने आपल्या षटकाराने  गल्ली क्रिकेटची आठवण व्हावी, असा षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. गल्ली क्रिकेटमध्ये चेंडू-फळीच्या रंगलेल्या डावात  शेजा-पाजाऱ्यांच्या काचा फोडण्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. आयरिश गड्याने स्थानिक सामन्यात गाड्यांची काच फोडल्याचे पाहायला मिळाले. त्याने लगावलेल्या फटक्याने त्याच्यात कारची काच फुटली. 

IPL 2020 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचे गडी अडकले कोरोनाच्या जाळ्यात

आयर्लंडचा स्टार क्रिकेटर केविन ओ'ब्रायन (Kevin O’Brien) एका षटकाराने प्रकाश झोतात आलाय. गुरुवारी स्थानिक स्तरावर खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात हा सर्व प्रकार घडला. या सामन्यात त्याने  37 चेंडूत 82 धावांची आतषबाजी केली.  पेमब्रोक क्रिकेट क्लबमध्ये  (Pembroke Cricket Club) रंगलेल्या सामन्यात ओ'ब्रायनने चेंडू थेट पार्किंगमध्ये धाडला. विशेष म्हणजे हा चेंडू त्याच्याच कारच्या काचेवर आदळला. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने ओ'ब्रायनच्या गाडीचा फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे.  ओ'ब्रायनने मारलेला षटकारात इतकी ताकद होती की  झाडांमधून वाट काढत चेंडूने कारच्या काचेचा वेध घेतला. सामना संपल्यानंतर 36 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटरला  गाडीची काच बदलण्यासाठी गॅरेजकडे गाठावे लागले.   

मेस्सीचा बार्सिलोना निरोप कायद्याच्या कचाट्यात?

ओ'ब्रायनने इंटर-प्रोविंशल टी-20 ट्रॉफीमध्ये रंगलेल्या सामन्यात धमाकेदार फटकेबाजी केली. त्याने 37 चेंडूत 82 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात लेन्स्टर लाइटनिंग संघाने नॉर्थ वेस्ट वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात 12 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 124 धावा केल्या. ओ'ब्रायनने आपल्या खेळीत  3 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार खेचले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या  नॉर्थ वेस्ट वॉरियर्स संघाला 12 षटकांत 8 बाद 104 धावांपर्यंतच मजल मारता आली. लेन्स्टर लाइटनिंग डकवर्थ लुईस नियमानुसार 24 धावांनी सामना खिशात घातला. 


​ ​

संबंधित बातम्या