आयसीसीच्या क्रमवारीत जॉनी बेयरस्टोनची अव्वल दहामध्ये झेप  

टीम ई-सकाळ
Thursday, 17 September 2020

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून जगजेत्या इंग्लंडला नमवत मालिका आपल्या खिशात घातली.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून जगजेत्या इंग्लंडला नमवत मालिका आपल्या खिशात घातली. या मालिकेतील पहिला सामना 19 धावांनी ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टोने या सामन्यात 84 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. यानंतर तिसऱ्या व अंतिम सामन्यात देखील जॉनी बेयरस्टोने 126 चेंडूत 112 धावांची शतकी पारी खेळली होती. त्यामुळे जॉनी बेयरस्टोने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे. 

ENGvsAUS : स्टार्कचा जबऱ्या स्टार्ट; पहिल्या दोन चेंडूत दोन गड्यांना धाडले...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जॉनी बेयरस्टोने 65.33 च्या सरासरीने 196 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये प्रत्येकी एक अर्धशतक आणि शतकाचा समावेश आहे. त्यामुळे जॉनी बेयरस्टोनने जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीत बढत घेतली असून, तो आता 23 गुणांसह दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. जॉनी बेयरस्टोन 777 अंकांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी पोहचला आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली 871 आणि सलामीवीर रोहित शर्मा 855 अंकासह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. याशिवाय इंग्लंडच्या ख्रिस वॉक्सने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत 6 बळी घेत जागतिक गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.   

दरम्यान, तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली ती फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि ॲलेक्स कॅरीने. या दोघांनीही धमाकेदार शतकी खेळी करत इंग्लंडने दिलेले 303 धावांच लक्ष्य 2 चेंडू बाकी असतानाच पूर्ण केले. इंग्लंड गेल्या चार वर्षात पहिल्यांदाच मायदेशात एकदिवसीय मालिकेत पराभूत झाला आहे. 2016 पासून इंग्लडने घरच्या मैदानात एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नव्हती.       


​ ​

संबंधित बातम्या