धोनीची जागा घेता येणार नाही, पण कार्तिकला चौथ्या स्थानासाठी प्रयत्न करता येईल

सुशांत जाधव
Thursday, 3 September 2020

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधाराने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी दिनेश कार्तिकला दोन आयपीएल स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करावी लागेल.

2021 च्या आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी संघात जागा मिळवायची असेल तर दिनेश कार्तिकला आयपीएलमध्ये चाथ्या क्रमांकावर खेळावे लागेल, असे माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचा महासंग्राम युएईच्या मैदानात रंगणार आहे. ही स्पर्धा आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा कोण घेणार? यासंदर्भात तर्क वितर्क लढवले जात असताना आकाश चोप्रा यांनी दिनेश कार्तिकही टी-20 संघात स्थान मिळवू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. संघात जागा निश्चित करण्यासाठी त्यांनी दिनेश कार्तिकला सल्लाही दिलाय. 

CPL2020 : निकोलसचा शतकी धमाका; धोनी स्टाइलनं दिला फिनिशिंग टच (Vidio)

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधाराने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी दिनेश कार्तिकला दोन आयपीएल स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करावी लागेल. त्याने वरच्या क्रमांकावर खेळत स्वत:ला सिद्ध केले तर त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते, असे आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. कार्तिक संघाकडून पाचव्या क्रमांवरच खेळत राहिला तर त्याला अधिक धावा करता येणार नाहीत. परिणामी त्याची दावेदार कमजोर ठरेल, असे आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे.  

लॉकडाउनमुळे नेमबाजी प्रशिक्षकावर पिस्तूल विकण्याची वेळ

आकाश चोप्रा म्हणाले आहेत की, यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकने चांगली कामगिरी बजावली आहे. परंतु सध्याच्या घडीला भारतीय संघात ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्यावर निवड समितीच्या नजरा आहेत. पण आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुन फलंदाजीच्या जोरावर कार्तिकने  चौथ्या क्रमांकासाठी दावेदारी मजबूत करुन संघात स्थान मिळवण्याचे प्रयत्न करायला पाहिजेत.  मागील दोन हंगामापासून कार्तिक कोलकाता नाइट रायडर्सच्या नेतृत्वाची जबाबादारी पार पाडत आहे.  2018 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने क्लालिफायरपर्यंत मजल मारली. मागील हंगामात कोलकाताचा संघ प्ले ऑफपर्यंतही पोहचू शकला नव्हता.


​ ​

संबंधित बातम्या