भारतीय महिलांची आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याची मोहीम सुरू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 August 2021

इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी केल्यानंतर भारतीय महिलांची आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याची मोहीम सुरू होणार आहे. बंगळूरमध्ये आजपासून सराव शिबिर सुरू होत आहे. पुढील महिन्यापासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होत आहे.

नवी दिल्ली - इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी केल्यानंतर भारतीय महिलांची आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याची मोहीम सुरू होणार आहे. बंगळूरमध्ये आजपासून सराव शिबिर सुरू होत आहे. पुढील महिन्यापासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होत आहे.

सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या हंड्रेड या स्पर्धेत हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा खेळत असल्याने या खेळाडू पुढील आठवड्यात सरावात दाखल होतील.

भारतीय महिला संघ २९ किंवा ३० ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियास प्रयाण करेल. तेथे त्यांना दोन आठवड्यांचे विलगीकरण करावे लागेल. सराव शिबिरासाठीच्या ३० आणि इंग्लंडमधून परतणाऱ्या वरील पाच अशा ३५ खेळाडूंमधून अंतिम संघ निवडण्यात येईल.

इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या २१ खेळाडूंचा ३० संभाव्य खेळाडूंत समावेश असेल. तंदुरुस्ती, कौशल्य विकास, तसेच एकमेकांमध्ये विभागून सराव सामने असे या शिबिराचे स्वरूप असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ प्रकाशझोतात कसोटी सामना खेळणार आहे.

असा आहे ऑस्ट्रेलियातील कार्यक्रम
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारताविरुद्धच्या या मालिकेचा कार्यक्रम अगोदरच जाहीर केला आहे. त्यानुसार पहिला एकदिवसीय सामना १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. पुढचे दोन सामने २२ आणि २४ सप्टेंबर रोजी होतील. त्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रकाशझोतातील कसोटी सामना होईल. ७, ९ आणि ११ ऑक्टोबर या तीन दिवशी ट्वेन्टी-२० मालिका असे सामने होणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या