"शंभर चेंडूच्या लीगसाठी भारतीय उत्सुक"

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 April 2021

इंग्लंड क्रिकेट मंडळाने दहा चेंडूंचे एक षटक आणि दहा षटकांचा एक डाव असे स्वरूप असलेली लीग गतवर्षी घेण्याचे ठरवले होते, पण कोरोनामुळे ती लांबणीवर पडली आहे.

नवी दिल्ली : भारतातील अनेक क्रिकेटपटू ‘दी हंड्रेड' अर्थात शंभर चेंडूची लीग खेळण्यास कमालीचे उत्सुक आहेत. केवळ हीच नव्हे, तर परदेशातील अनेक लीग खेळण्याची त्यांची तयारी आहे, असा दावा इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या लढतींसाठीचा कर्णधार इऑन मॉर्गन याने केला. इंग्लंड क्रिकेट मंडळाने दहा चेंडूंचे एक षटक आणि दहा षटकांचा एक डाव असे स्वरूप असलेली लीग गतवर्षी घेण्याचे ठरवले होते, पण कोरोनामुळे ती लांबणीवर पडली आहे.

मॉर्गन सध्या आयपीएलसाठी भारतात आहे. दी हंड्रेड लीगबाबत भारतात नुकतीच चर्चा ऐकली. यात तसेच अनेक लीग खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू उत्सुक आहेत; पण मी त्यांचे नाव सांगणे उचित होणार नाही, असे मॉर्गनने स्काय स्पोर्टस््ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भारतीय खेळाडू नव्या वातावरणात, नव्या प्रयोगास सामोरे जाण्यास तयार असतात, असे मॉर्गन म्हणाला. 

IPL 2021 : MI षटकार मारणार; CSK तळालाच राहणार; दिग्गजाने केली भविष्यवाणी

मॉर्गनचा दावा

दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय लढतीऐवजी लीगला जास्त महत्त्व येईल. क्रिकेट प्रशासकांनी खेळाच्या तीनही प्रकाराचे महत्त्व ओळखून त्याच्या स्वतंत्र वाढीसाठी पुरेसे उपायच केले नाहीत. ट्वेंटी २० मुळे अनेक युवा खेळाडू क्रिकेटकडे आकर्षित होतात. कसोटी क्रिकेट हे प्रतीथयश खेळाडूंचे असेल; तसेच ते काही देशांपुरतेच राहील, हे लक्षात घ्यायला हवे.


​ ​

संबंधित बातम्या