भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला रोखले

सुनंदन लेले
Thursday, 5 August 2021

काहीशा मातकट दिसणाऱ्या  खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होणार नाही असा अंदाज लावत इंग्लंडचा कप्तान ज्यो रूटने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. ज्यो रूटचा निर्णय संपूर्ण कामी आला असे म्हणता येणार नाही.

काहीशा मातकट दिसणाऱ्या  खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होणार नाही असा अंदाज लावत इंग्लंडचा कप्तान ज्यो रूटने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. ज्यो रूटचा निर्णय संपूर्ण कामी आला असे म्हणता येणार नाही. कारण भारतीय गोलंदाजांनी चांगल्यापैकी शिस्त पाळत मारा करून इंग्लंडच्या फलंदाजांना सहजी फटके मारून दिले नाहीत. पहिल्या दिवशी चहापानापर्यंतचा ५० षटकांचा खेळ संपताना इंग्लंडने  ४ बाद १३८  धावा उभारल्या.

अजून एक नाणेफेक हरणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्याकरिता मैदानात संघ उतरवताना  अश्विनपेक्षा जडेजावर विश्वास दाखविल्याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले. 

अपेक्षे प्रमाणे के एल राहुल आणि सिराजला संधी मिळाली. त्याबरोबर शार्दूल ठाकूरला विराटने संघात घेताना त्याच्या अष्टपैलू कौशल्यावर नजर ठेवल्याचे दिसले. इंग्लंडने चार वेगवान गोलंदाजांसह सामना खेळायचा निर्णय घेतला.

जसप्रीत बुमराने चिवट आणि चिकट रोरी बर्न्सला पहिल्याच षटकात पायचीत करून झकास सुरवात करून दिली. महंमद शमीने चेंडू चांगले स्विंग केले. उपहाराअगोदर सिराजने क्रॉलीला बाद करून इंग्लंडला अजून एक धक्का दिला. उपाहाराला २ बाद ६१ धावसंख्या असताना सिबली संयमाने १८ धावा काढून नाबाद परतला होता. उपाहारानंतर शमीने सिबलीचा अडसर लगेच दूर केला.


​ ​

संबंधित बातम्या