भारत-न्यूझीलंड कसोटीमध्ये कोण होणार विजेता, उत्सुकता वाढली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 June 2021

भारताचा सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार, परंतु एकही करंडक न जिंकता आलेला कर्णधार विराट कोहली आणि अंतिम सामन्यात वारंवार अपयशी ठरलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन यापैकी कोण उंचावणार कसोटी अजिंक्यपदाचा करंडक? उत्कंठा कमालीची ताणलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला रंगाचा बेरंग करण्यास पाऊसही सज्ज झालेला आहे.

साऊदम्टन - भारताचा सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार, परंतु एकही करंडक न जिंकता आलेला कर्णधार विराट कोहली आणि अंतिम सामन्यात वारंवार अपयशी ठरलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन यापैकी कोण उंचावणार कसोटी अजिंक्यपदाचा करंडक? उत्कंठा कमालीची ताणलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला रंगाचा बेरंग करण्यास पाऊसही सज्ज झालेला आहे.

पाऊस आणि ढगाळ हवामानाच्या लपंडावात हा सामना होत असला तरी भारताने समतोल गोलंदाजी निवडली आहे. बुमरा, ईशात आणि शमी या वेगवान गोलंदाजांसह जडेजा आणि अश्विन असे दोन फिरकी गोलंदाज असणार आहेत. 

आयसीसीसाठी ही महत्त्वाकांक्षी स्पर्धा आणि उद्यापासून सुरू होणारा अंतिम मुकाबला. कोणत्याही परिस्थितीत निकाली ठरवण्यासाठी आयसीसीने एका अतिरिक्त दिवसाचीही सोय केली आहे, पण मुळात लहरी असलेल्या हवामानावर विजेता कोण? याचे भवितव्य ठरणार आहे. 

या सामन्याच्या समालोचनासाठी सुनील गावसकर साऊदम्टनमध्ये दाखल झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्ह येथे असल्याचे गावसकर यांनी सांगितलेले आहे, पण उद्यापासून वातावरणात बदल होत आहे आणि तोच कदाचित सामन्याची दिशा बदलणाराही ठरू शकेल. 

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रित बुमरा, ईशांत शर्मा आणि महम्मद शमी.
थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस.
वेळ - दुपारी ३ पासून

काय आहे हवामानाचा अंदाज?

  • १८ जून - स्थानिक हवामान खात्याने उद्या शुक्रवारसाठी यलो वॉर्निंग दिली आहे. वादळी पावसाचा ९० टक्के अंदाज वर्तवला आहे. 
  • १९ जून - हवमानात थोडी सुधारणा, पण ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता
  • २० जून - पहाटे जोरदार पावसाची अंदाज, दुपारनंतर सुधारणा
  • २१ जून - थंड वारे आणि ४० टक्के पावसाचा अंदाज
  • २२ जून - ढगाळ हवामान आणि थंड वारे
  • २३ जून (राखीव दिवस) - सूर्यप्रकाशाचा अंदाज त्यामुळे पूर्ण दिवस खेळाची शक्यता

​ ​

संबंधित बातम्या