विश्वकरंडक ट्वेंटी२० साठी भारतास २८ जूनपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

विश्वकरंडक टे्वेटी २० क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट मंडळास २८ जूनपर्यंत मुदत दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणावर आढळत असलेल्या कोरोना रुग्णामुळे बीसीसीआयला ही मुदत देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली - विश्वकरंडक टे्वेटी २० क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट मंडळास २८ जूनपर्यंत मुदत दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणावर आढळत असलेल्या कोरोना रुग्णामुळे बीसीसीआयला ही मुदत देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दुबईतील या बैठकीस प्रामुख्याने बहुतेक देशांचे प्रतिनिधी ऑनलाइन सहभागी झाले. मात्र या बैठकीसाठी सौरव गांगुली, सचिव जय शाह तसेच उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे दुबईत गेले होते. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यासाठी भारताने अपेक्षेनुसार एका महिन्यांची मुदत मागितली. भारतातील आरोग्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ती मान्य करण्यात आली. 

भारतीय मंडळाची विनंती आयसीसीने मान्य केली आहे आण २८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय मंडळाने भारतात स्पर्धा घेण्यास असमर्थता दर्शवली, तर ही स्पर्धा अमिरातीत होईल, पण स्पर्धेचे यजमानपद भारतीय मंडळाकडेच राहील, असे ठरले असल्याचेही समजते.


​ ​

संबंधित बातम्या