भारत-ऑस्ट्रेलिया मालिका प्रकाशझोतातील कसोटीने सुरू 

संजय घारपुरे
Thursday, 8 October 2020

एकदिवसीय लढती तसेच ट्‌वेंटी 20 मालिका एकाच ठिकाणी 

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेस प्रकाशझोतातील लढतीने सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. प्रतिस्पर्ध्यांतील कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वी प्रतिस्पर्ध्यांत एकदिवसीय आणि ट्‌वेंटी 20 मालिका होईल. 

क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटीच्या तारखा निश्‍चित केल्या आहेत, पण एकदिवसीय तसेच ट्‌वेंटी 20 मालिकेचा कालावधीच ठरवला आहे. एकदिवसीय मालिका 25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान होतील. तीन सामन्यांच्या मालिकेतील सर्व लढती ब्रिस्बेनला होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर 4 ते 8 डिसेंबरदरम्यान ट्‌वेंटी मालिका होईल. तीन सामन्यांची मालिका ऍडलेडला होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर भारतीय संघ ऍडलेडचा प्रकाशझोतातील सराव सामना खेळणार आहे. त्याच ठिकाणी पहिली कसोटी होईल. हा सराव सामना भारतीय संघातील खेळाडूतच होण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे ही मालिका जैवसुरक्षित वातावरणात होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघासह सराव सामना होणार नाही. 

टी -20 क्रिकेटबाबत गावस्करांनी सुचवला पर्याय ; गोलंदाजांवरील दबाव कमी होणार? 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या प्रस्तावास भारतीय मंडळाने मंजुरी दिली आहे, पण ऑस्ट्रेलियातील राज्य सरकारनी अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यातही क्वीन्सलॅंड प्रशासनाची मंजुरी मोलाची आहे. याच ठिकाणी भारतीय संघाचे आगमन होईल. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे विलगीकरण होणार आहे. क्वीन्सलॅंडने अद्याप परदेशी व्यक्तींच्या आगमनास मंजुरी दिलेली नाही. परदेशातून किंवा अन्य राज्यांतून आलेल्यांना क्वीन्सलॅंडमध्ये 14 दिवसांचे विलगीकरण अत्यावश्‍यक आहे. भारतीय मंडळ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाची यास तयारी आहे, पण विलगीकरणात असताना सरावास मंजुरी हवी आहे. 

दौऱ्याचा प्रस्तावित कार्यक्रम 
25 ते 30 नोव्हेंबर : एकदिवसीय मालिका (ब्रिस्बेन) 
4 ते 8 डिसेंबर : ट्‌वेंटी 20 मालिका (ऍडलेड) 
17 ते 21 डिसेंबर : पहिली कसोटी (ऍडलेड) 
26-30 डिसेंबर : दुसरी कसोटी (मेलबर्न) 
7 ते 11 जानेवारी : तिसरी कसोटी (सिडनी) 
15 ते 19 जानेवारी : चौथी कसोटी (ब्रिस्बेन)


​ ​

संबंधित बातम्या