कसोटी जगज्जेतेपद लढत अनिर्णीत राहिली तर...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

कसोटी क्रिकेट जगज्जजेतेपदाची लढत एका महिन्यावर आली आहे, पण ही लढत अनिर्णीत राहिली, पावसामुळे पूर्ण वाया गेली तर जगज्जेता कोणत्या आधारे निश्चित होणार, या उत्तराची भारतीय मंडळास अजूनही प्रतीक्षा कायम आहे.

नवी दिल्ली - कसोटी क्रिकेट जगज्जजेतेपदाची लढत एका महिन्यावर आली आहे, पण ही लढत अनिर्णीत राहिली, पावसामुळे पूर्ण वाया गेली तर जगज्जेता कोणत्या आधारे निश्चित होणार, या उत्तराची भारतीय मंडळास अजूनही प्रतीक्षा कायम आहे.

कसोटी जगज्जेतेपदाची लढत १८ जूनपासून साऊदम्प्टनला आहे. या लढतीसाठीची नियमावलीच अद्याप आयसीसीने जाहीर केलेली नाही. ती काही दिवसांत जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. ही लढत अनिर्णीत राहिली, बरोबरीत सुटली किंवा पावसामुळे झालीच नाही तर विजेता कसा ठरणार याबाबतचे नियम स्पष्ट असावेत, असे भारतीय मंडळाचे मत आहे. 

दरम्यान, या कसोटीपूर्वी भारतीय संघाचे विलगीकरणही साऊदम्प्टनला होणार आहे. याच ठिकाणी इंग्लंड आणि न्यूझीलंड मालिकेतील दोन कसोटी होणार आहेत. भारतीय संघ आयसीसीच्या लढतीसाठी इंग्लंडला जात आहे. त्यामुळे त्यावेळी असलेले विलगीकरण कसे असेल हे आयसीसीनेच ठरवणे योग्य होईल, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या