आयसीसी कसोटी क्रमवारीत केएल राहुल, सिराजची प्रगती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 August 2021

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयात निर्णायक कामगिरी करणाऱ्या केएल राहुल आणि महम्मद सिराज आणि कसोटी मानांकनात मोठी भरारी घेतली आहे.

मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयात निर्णायक कामगिरी करणाऱ्या केएल राहुल आणि महम्मद सिराज आणि कसोटी मानांकनात मोठी भरारी घेतली आहे.

राहुल सामन्यात सर्वोत्तम ठरला होता. २०१७ मध्ये तो फलंदाजीत आठव्या स्थानावर होता, परंतु हा कसोटी सामना सुरू होण्याअगोदर तो ३७ व्या क्रमांकावर होता. आता त्याने १९ गुण मिळवत ३७ व्या स्थानी उडी मारली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावांत मिळून १२६ धावांत आठ विकेट मिळवणाऱ्या महम्मद सिराजलाही या कामगिरीमुळे १८ गुण मिळाले आणि तो गोलंदाजीच्या क्रमवारीत ३८ व्या क्रमांकावर आला.

फलंदाजीत केन विल्यमसन अव्वल स्थानावर कायम आहे. त्यानंतर ज्यो रूट, स्टिव स्मिथ, मार्लन लाबुशेन आणि विराट कोहली अशी क्रमवारी आहे.


​ ​

संबंधित बातम्या