अमिरातीच्या दोन क्रिकेटपटूंवर आयसीसीने केली कारवाई ; वाचा कारण

टीम ई-सकाळ
Sunday, 13 September 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन क्रिकेटपटूंवर भ्रष्टाचारा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन क्रिकेटपटूंवर भ्रष्टाचारा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने यूएईचे क्रिकेटपटू आमिर हयात आणि अशफाक अहमद यांच्याविरूद्ध भ्रष्टाचारविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आरोप निश्चित केले आहेत. व तसेच या दोन्ही खेळाडूंना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.

प्रत्येक सामन्यानंतर कोबी ब्रायंटची जर्सी का घातली? नाओमीने केला खुलासा

अमीराती क्रिकेट मंडळाने अशफाक अहमदला मागील वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आयसीसीच्या टी -20 विश्वचषक पात्रता स्पर्धेदरम्यान निलंबित केले होते. मात्र त्यावेळेस त्याच्यावर आरोप निश्चित केले नव्हते. आमिर हयात आणि अशफाक अहमद यांनी लाच घेऊन सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केला होता. 38 वर्षीय आमिर हयात मध्यमगती गोलंदाज असून त्याने नऊ एकदिवसीय आणि चार टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर, 35 वर्षीय अशफाकने 16 एकदिवसीय आणि 12 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

कोरोनाशी लढा दिल्यानंतर ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार संघात परतला  

त्यानंतर आज आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, या दोन्ही खेळाडूंना त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी 13 सप्टेंबरपासून 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला असल्याचे म्हटले आहे. आमिर आणि अशफाक यांच्यावर आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम  2.1.3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, त्यांच्यावर कलम 2.4.2 ते  2.4.5 पर्यंत इतर चार आरोप निश्चित केले आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या