महम्मद अझरुद्दीन यांची हैदराबाद क्रिकेट संघटनेने केली हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 June 2021

हैदराबाद क्रिकेट संघटनेने घटनेचे उल्लंघन केल्यामुळे अध्यक्षपदी असलेले भारताचे माजी कर्णधार महम्मद अझरुद्दीन यांची संटनेच्या कार्यकारी सदस्यांनी पदावरून हकालपट्टी केली.

हैदराबाद - हैदराबाद क्रिकेट संघटनेने घटनेचे उल्लंघन केल्यामुळे अध्यक्षपदी असलेले भारताचे माजी कर्णधार महम्मद अझरुद्दीन यांची संटनेच्या कार्यकारी सदस्यांनी पदावरून हकालपट्टी केली.

अझरुद्दीन यांच्यावर दुहेरी हितसंबंधांचाही आरोप आहे. अध्यक्षपदावरून करण्यात आलेल्या हकालपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते, कारण अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला पदावरून दूर करण्याचे अधिकार केवळ कार्यकारी संघटनेच्या सर्वसाधारण सभेला आहेत. कार्यकारी सदस्य अशा प्रकारणात कारवाई करू शकत नाही. तसेच या कार्यकारी मंडळातील पाच सदस्यांची अगोदरच चौकशी केली जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या