‘बीसीसीआय’ला उच्च न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 June 2021

‘आयपीएल’मधून ‘डेक्कन क्रोनिकल होल्डिंग लिमिटेड’ला गैरप्रकारे डच्चू दिल्याने बीसीसीआयने तब्बल सुमारे ४,८१४ कोटी रुपये ‘डीसीएचएल’ला द्यावे, हा लवादाने दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केला. यामुळे ‘बीसीसीआय’ला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई - ‘आयपीएल’मधून ‘डेक्कन क्रोनिकल होल्डिंग लिमिटेड’ला गैरप्रकारे डच्चू दिल्याने बीसीसीआयने तब्बल सुमारे ४,८१४ कोटी रुपये ‘डीसीएचएल’ला द्यावे, हा लवादाने दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केला. यामुळे ‘बीसीसीआय’ला मोठा दिलासा मिळाला आहे.

हैदराबादमधील डेक्कन चार्जर टीमचे मालक ‘डीसीएचएल’ला बीसीसीआयने २०१२ च्या आयपीएल सत्रात परवानगी दिली नव्हती. याविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर न्यायालयाने लवादाची नियुक्ती केली होती. कंपनीने केलेल्या आरोपांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश त्या वेळी देण्यात आले होते.

मागील वर्षी जुलैमध्ये लवादाने यावर निकाल दिला होता. यानुसार बीसीसीआयने गैरप्रकारे कंपनीची फ्रॅंचायझी रद्द केली. त्यामुळे भरपाई म्हणून बीसीसीआयने ४,८१४.६७ कोटी रुपये दहा टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले होते.


​ ​

संबंधित बातम्या