क्रिकेटबद्दल भज्जी करणार मोठा खुलासा ; ट्विट मधून दिले संकेत 

टीम ई-सकाळ
Saturday, 12 September 2020

चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने काही दिवसांपूर्वीच आपण यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नसल्याचे सोशल मीडियाद्वारे जाहीर करत सर्वांनाच चकित केले होते.

यंदाच्या बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचे सामने 19 संप्टेंबर पासून संयुक्त अरब अमिरातीत सुरु होत आहेत. त्यामुळे आयपीएल मधील सर्व आठही संघांचे खेळाडू काही दिवसांपूर्वीच अरब अमिरातीत दाखल झाले होते. मात्र चेन्नई सुपर किंग्स संघातील फलंदाज सुरेश रैना आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी वैयक्तीक कारणास्तव यंदाच्या हंगामातून माघार घेतली होती. याबाबत या दोन्ही खेळाडूंनी सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्यानंतर आता हरभजन सिंग आणखी एक मोठा खुलासा करणार आहे. 

IPL 2020 : हिटमॅननंतर धोनीच्या भात्यातून उत्तुंग फटका (Video)   

चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने काही दिवसांपूर्वीच आपण यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नसल्याचे सोशल मीडियाद्वारे जाहीर करत सर्वांनाच चकित केले होते. त्यानंतर आता पुन्हा हरभजन सिंगने सोशल मीडियाच्या ट्विटरवरून येत्या काही दिवसात मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे. हरभजन सिंगने केलेल्या या ट्विटमध्ये क्रिकेटबद्दल आपल्याला मोठी गोष्ट समजली असल्याचे म्हटले असून, त्यानुसार क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमस्वरूपी पूर्णपणे बदलेल असे हरभजनने म्हटले आहे.  

शिवाय, सध्याच्या घडीला क्रिकेट चर्चेत आहे आणि आत्ता असे काहीतरी घडले आहे ज्यामुळे क्रिकेटचे चित्र कायमचे बदलू शकेल, असे हरभजन सिंगने आपल्या या ट्विट संदेशात लिहिले आहे. तसेच घडलेल्या गोष्टीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडणार असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र हरभजन सिंगने केलेल्या या ट्विट संदर्भातील माहिती अजूनतरी गुलदस्त्यातच आहे. परंतु हरभजनच्या या ट्विटवरून क्रिकेट जगतात काहीतरी मोठे होणार असे दिसते आहे. 


​ ​

संबंधित बातम्या