टी -20 क्रिकेटबाबत गावस्करांनी सुचवला पर्याय ; गोलंदाजांवरील दबाव कमी होणार?

टीम ई-सकाळ
Thursday, 8 October 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा 13 वा सत्र सध्या युएईमध्ये होत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे ही स्पर्धा भारतातून युएईमध्ये घेण्यात येत आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात होत असलेल्या या स्पर्धेत फलंदाज वर्चस्व गाजवताना दिसत आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा 13 वा सत्र सध्या युएईमध्ये होत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे ही स्पर्धा भारतातून युएईमध्ये घेण्यात येत आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात होत असलेल्या या स्पर्धेत फलंदाज वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. आणि युएई मधील सपाट खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना फार काही करण्यासारखे नाही. मात्र शारजा येथील सामने सोडल्यास दुबई आणि अबुधाबी येथील मैदानावर गोलंदाज फलंदाजांच्या बरोबरीने प्रभाव पाडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे फलंदाज यांच्याकडून धावांचा पाऊस पडत असताना गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत सामन्याचा निकाल आपल्या बाजूने झुकवत आहेत. त्यामुळेच भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टी -20 क्रिकेटची स्थिती चांगली असून, बदलांची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र एका षटकात दोन बाउन्सरला परवानगी देता येऊ शकत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

सुनील गावस्कर यांनी एका मुलाखती दरम्यान, टी -20 क्रिकेट मध्ये गोलंदाजांवरील दबाव कमी करण्यासाठी नियमांमध्ये बदल करणे आवश्यक नसल्याचे म्हटले आहे. तसेच सध्याच्या स्थितीला टी -20 क्रिकेट मध्ये गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील स्थिती संतुलित असल्याचे मत देखील त्यांनी नोंदवले. मात्र टी -20 प्रकार हा फलंदाजांच्या अनुरुप असल्याचे वाटल्यास  वेगवान गोलंदाजांना प्रत्येक षटकात दोन बाउन्सर करण्याची परवानगी देता येऊ शकत असलयाचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सीमारेषेचे अंतर वाढविले देखील जाऊ शकत असल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे. 

याशिवाय नॉन स्ट्रायकर फलंदाज गोलंदाजीच्या आधी क्रीजच्या बाहेर आला नाही की नाही हे तपासण्याचा अधिकार टीव्ही पंचांना असावा. आणि तसे झाल्यास गोलंदाज गोलंदाजीच्या आधी नॉन स्ट्रायकर फलंदाजाला धावचीत करू शकतो. याव्यतिरिक्त नॉन स्ट्रायकर फलंदाज गोलंदाजीच्या आधी क्रीजच्या बाहेर आल्यास आणि त्याचवेळी चौकार गेल्यास धावांचा दंड करता येऊ शकत असल्याचे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. त्यामुळे नॉन स्ट्रायकर फलंदाज  क्रीजच्या बाहेर देखील येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच गावस्कर यांनी मंकडिंग या शब्दाचा विरोध केला असून, या शब्दाचा वापर करणे म्हणजे भारताचा महान क्रिकेटर वीणू मांकड यांचा अपमान करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. 1948 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान वीणू मांकड यांनी बिली ब्राऊनला याच प्रकारे बाद केले होते. आणि त्यावेळेस ऑस्ट्रेलियाचे कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनी वीणू मांकड त्याच्या जागी योग्य आहे आणि त्याने नियमांच्या कक्षेतच बिली ब्राऊनला बाद केल्याचे म्हटले असल्याची आठवण गावस्कर यांनी यावेळी करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी अशा प्रकारच्या विकेट घेण्याला मंकडिंग म्हटल्याचे गावस्कर यांनी सांगितले.              
 


​ ​

संबंधित बातम्या