निवड समितीसाठी कुरुविल्लाही शर्यतीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

विद्यमान समितीतील शपणदीप सिंग (उत्तर विभाग), देवांग गांधी (पूर्व) आणि जतिन परांजपे (पश्‍चिम) यांची टर्म संपल्याने तीन जागा रिकाम्या झाल्या आहेत.

मुंबईः भारतीय क्रिकेटच्या निवड समितीत रिकाम्या झालेल्या जागेसाठी माजी वेगवान गोलंदाज ॲबी कुरुविल्लाही शर्यतीत उतरले आहेत. मुंबईच्याच अजित आगरकर यांचे त्यांना आव्हान असेल. विद्यमान समितीतील शपणदीप सिंग (उत्तर विभाग), देवांग गांधी (पूर्व) आणि जतिन परांजपे (पश्‍चिम) यांची टर्म संपल्याने तीन जागा रिकाम्या झाल्या आहेत. कुरुविल्ला हे 10 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. अर्ज करण्याच्या दोन दिवस अगोदरच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

पुन्हा मैदानात आल्याचा आनंद : शास्त्री

 टीम इंडियाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar), चेतन शर्मा (Chetan Sharma), मनिंदर सिंह आणि शिव सुंदर दास, बंगालचे माजी जलदगती गोलंदाज राणादेव बोस यांसारख्या माजी क्रिकेटर्सनी अर्ज दाखल केले आहेत.  अजित आगरकरडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा तगडा अनुभव आहे.

'विराट' मिम्सवर सूर्याचा लाईक-अनलाईक खेळ

आगरकरने 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि चार टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. यामध्ये त्याने 349 विकेट मिळवल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याने 42 सामन्यांमध्ये 29 बळी मिळवले आहेत. आगरकरच्या तुलनेत इतर अर्जदारांचा अनुभव कमी आहे. त्यामुळे आगरकर निवड समितीच्या प्रमुखपदाचा मुख्य दावेदार मानले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या