सचिनच्या नावाचा गैरवापर करु नका; माजी क्रिकेटपटूची संतप्त प्रतिक्रिया 

टीम ई-सकाळ
Saturday, 12 September 2020

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा मैदानावरील त्याच्या खेळाव्यतिरिक्त आपल्या नम्र व उत्तम व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा मैदानावरील त्याच्या खेळाव्यतिरिक्त आपल्या नम्र व उत्तम व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो. मात्र आता जगातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावाचा गैरवापर होत असल्याबद्दल भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सचिनची शिफारस आणणाऱ्यांनी  त्याच्या सारख्या खेळाडूच्या नावाचा दुरुपयोग करू नये, असे खडे बोल लालचंद राजपूत यांनी सुनावले आहे.

IPL 2020 : हिटमॅननंतर धोनीच्या भात्यातून उत्तुंग फटका (Video)   

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात प्रशिक्षक निवडण्यासाठी एकूण 24 जणांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यातील अनेकांनी या प्रशिक्षक निवड प्रक्रियेमध्ये सचिनच्या नावाचा शिफारशीसाठी उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर लालचंद राजपूत यांनी आपण सचिन तेंडुलकरचा आदर करतो, मात्र सचिनचे नाव घेत त्याने शिफारस केले असल्याचे सांगणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त सचिनला आपण सर्वजण चांगले ओळखतो. त्यामुळे सचिनला जर एखाद्याची शिफारस करायचीच असेल तर तो थेट अध्यक्ष किंवा सीआयसीशी बोलेल, असे राजपूत यांनी म्हटले आहे. तसेच सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचं प्रतीक आहे. आणि जर त्याच्याकडे काही सूचना असतील तर ते आमच्यासमोर बोलण्याचा त्याला संपूर्ण हक्क असल्याचे मत लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले आहे. 

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच

दरम्यान, लालचंद राजपूत यांना एमसीएच्या अ‍ॅपेक्स कांउन्सिलचे सदस्य अमित दानी यांनी एक मेल केला होता. ज्यामध्ये पुढील गैरसमज टाळण्यासाठी संयोजकांनी सीआयसीच्या बैठकीला हजर राहण्यासंदर्भात लिहिले होते. अमित दानी यांच्या या मेलला लालचंद राजपूत यांनी वरील रिप्लाय केलेला आहे. तसेच त्यांनी दिलेल्या आपल्या उत्तरात कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसल्याचे म्हणत, आपण सर्व गोष्टींवर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या