ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचे निधन

टीम ई-सकाळ
Thursday, 24 September 2020

क्रिकेटच्या जगतातील लोकप्रिय स्पर्धा म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) सुरवात होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. आणि अशातच ऑस्ट्रेलियाचे  माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

क्रिकेटच्या जगतातील लोकप्रिय स्पर्धा म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) सुरवात होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. आणि अशातच ऑस्ट्रेलियाचे  माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. माजी क्रिकेटपटू आणि नंतर समालोचक असलेले डीन जोन्स हे 59 वर्षांचे होते. सध्याच्या घडीला ते आयपीएल स्पर्धेचे समालोचन मुंबईतून करत होते. ऑस्ट्रेलियाच्या संघात फलंदाज असलेल्या डीन जोन्स यांनी निवृत्तीनंतर देखील सर्वच प्रकारांनी आपले नाते क्रिकेटशी जोडून ठेवले होते. 

डीन जोन्स यांनी 1984 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले होते. आणि त्यानंतर त्यांनी 52 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते. कसोटी कारकिर्दीत जोन्स यांनी 46.55 सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात 44.61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे त्यांना जगातील एकदिवसीय सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते. याव्यतिरिक्त जोन्स यांना त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी म्हणून देखील ओळखले जात होते.    

IPL2020: बंगळूरसाठी आज कोण ठरणार तारणहार?

जोन्स यांनी कसोटी प्रकारात ऑस्ट्रेलियाकडून 3,600 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर 6,000 पेक्षा जास्त धावा क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारात केल्या आहेत. त्यानंतर 2019 मध्ये डीन जोन्स याना ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले होते. तसेच जोन्स यांनी आपल्या कारकीर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये दोन दुहेरी शतके लगावले होते. ज्यात 1986 मध्ये चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे भारताविरुद्ध 210 धावांची मोठी खेळीचा समावेश आहे. जोन्स यांच्या जाण्यानंतर क्रिकेट विश्वातील सर्व दिग्गज क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे.  

तसेच, डीन जोन्स हे आयपीएलच्या अधिकृत ब्रॉडकास्टर कॉमेंट्री पॅनेलचे भाग असल्यामुळे, स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना ते एक महान दूत व दक्षिण आशियातील क्रिकेटच्या विकासाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. आणि नवीन कलागुण, युवा क्रिकेटपटू शोधण्यात ते माहीर असल्याचे स्टार स्पोर्ट्सने म्हटले आहे. शिवाय यंदाच्या आयपीएल हंगामात समालोचक म्हणून त्यांची उपस्थिती आणि खेळ सादर करण्याच्या पद्धतीने चाहत्यांना आनंद दिल्याचे अधीकृत ब्रॉडकास्टरने नमूद केले आहे.     

 


​ ​

संबंधित बातम्या