क्रिकेटच्या सामन्यात पहिल्यांदाच मिळणार प्रेक्षकांना परवानगी  

टीम ई-सकाळ
Monday, 14 September 2020

यूरोपातील बुन्देसलिगा फुटबॉल लीगच्या आयोजनानंतर जून महिन्यात इंग्लंड आणि वेस्टइंडीज यांच्यातील कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरवात झाली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच क्षेत्रांसह क्रीडा जगताला देखील मोठा फटाका बसला. त्यामुळे सुरवातीला काही काळ सर्वच क्रीडा स्पर्धांची आयोजने  थांबविण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत खेळाडू पुन्हा मैदानावर उतरले. यूरोपातील बुन्देसलिगा फुटबॉल लीगच्या आयोजनानंतर जून महिन्यात इंग्लंड आणि वेस्टइंडीज यांच्यातील कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरवात झाली. मात्र क्रिकेट मधील हे सामने सुरु करताना प्रेक्षकांना स्टेडियमवर परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता महिलांच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या मालिकेमध्ये प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थिती लावता येणार आहे. 

श्रीसंतचा खेळण्याचा मार्ग मोकळा ; स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील बंदी उठली  

महिलांच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या महिन्याच्या अखेरीस 26  सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या मालिकेतील सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील आरोग्य विभागाने सामन्याच्या वेळेस निम्म्या प्रेक्षकांना मैदानावर सामना पाहण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन देखील करण्यात येणार आहे. तर दर्शकांसाठी स्टेडियम मध्ये ठराविक विभाग केले जाणार आहेत.   

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे वेळापत्रक - 

पहिला टी-20: 26 सप्टेंबर

दुसरा टी-20: 27 सप्टेंबर

तिसरा टी-20: 30 सप्टेंबर

एकदिवसीय मालिका - 

पहिला एकदिवसीय एकदिवसीय : 3 ऑक्टोबर

दुसरा एकदिवसीय एकदिवसीय : 5 ऑक्टोबर

तिसरा एकदिवसीय सामना : 7 ऑक्टोबर


​ ​

संबंधित बातम्या