इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या रंगणार शेवटचा व निर्णायक एकदिवसीय सामना 

टीम ई-सकाळ
Tuesday, 15 September 2020

कोरोनानंतर पहिल्यांदाच खेळवण्यात येत असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने जिंकून 1 - 1 अशी बरोबरी साधली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात उद्या बुधवारी 16 तारखेपासून शेवटचा व निर्णायक एकदिवसीय सामना होणार आहे. 

वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपासून तब्बल चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरवात झाली होती. त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये प्रत्येकी तीन कसोटी आणि टी-20 सामने झाले. आणि त्यानंतर मग ऑस्ट्रेलियाचा तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला. या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात तीन टी-20 सामन्यांपैकी दोन सामने इंग्लंडने जिंकत मालिका आपल्या खिशात घातली. तर कोरोनानंतर पहिल्यांदाच खेळवण्यात येत असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने जिंकून 1 - 1 अशी बरोबरी साधली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात उद्या बुधवारी 16 तारखेपासून शेवटचा व निर्णायक एकदिवसीय सामना होणार आहे. 

IPL2020: मुंबई की चेन्नई ; गंभीरने सांगितलं कोण ठरणार वरचढ?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 सप्टेंबर रोजी मँचेस्टर येथे पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 19 धावांनी यजमान इंग्लंड संघाला नमवत विजय मिळवला होता. व या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत  1 - 0 ने बढत मिळवली होती. मात्र त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या हातातील सामना जिंकत मालिकेत  1 - 1 ने बरोबरी साधली होती. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात, मालिकेवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ मैदानावर उतरतील. 

IPL2020 ची संपूर्ण तयारी झाली; दादाने शेअर केले खास फोटो

दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेस शेवटच्या फळीतील टॉम करन (37) आणि आदिल रशिद (35) यांनी नवव्या विकेटसाठी केलेली 76 धावांची भागीदारी मोलाची ठरली होती. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे इंग्लंडच्या संघाला 231 धावांपर्यंत मजल मारता आली होती. यानंतर 231 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 207 धावांवर आटोपला होता. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात 24 धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंडच्या सॅम करनने 35, जोफ्रा आर्चरने 34 आणि ख्रिस वोक्सने 32 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. 
            


​ ​

संबंधित बातम्या