इंग्लंडच्या त्रिकुटाचा भेदक मारा ; ऑस्ट्रेलियाने हातचा सामना गमावला

टीम ई-सकाळ
Monday, 14 September 2020

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 231 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 48.4 षटकात 207 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंड संघाने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. 

मुंबई इंडियन्स संघाने केली कोरोनाची चाचणी 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीस उतरलेला इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बैरस्टोवला मिशेल स्टार्कने अॅलेक्स कॅरीकडे शून्य धावांवर झेलबाद केले. तर जेसन रॉयला देखील 21 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर इंग्लंडच्या संघातील कोणत्याही खेळाडूस मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र शेवटच्या फळीतील टॉम करन (37) आणि आदिल रशिद (35) यांनी नवव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचल्यामुळे  इंग्लंडच्या संघाला 231 धावांपर्यंत मजल मारता आली. ईऑन मॉर्गनने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाचा ऍडम झम्पाने गोलंदाजी करताना 36 धावांच्या बदल्यात 10 षटकात 3 विकेट घेतल्या.   

यानंतर इंग्लंडने दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या 6 आणि मार्कस स्टोईनिस 9 धावांवरबाद झाला. या दोघांनाही जोफ्रा आर्चरने बटलरकरवी झेलबाद केले. मात्र त्यानंतर अॅरॉन फिंच आणि मार्नस लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलिया संघाची फळी सांभाळली. या दोघांनी 107 धावांची बहुमोल भागीदारी केली. परंतु ही जोडी इंग्लंडने फोडल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे उर्वरित खेळाडूंनी मैदानावर फक्त हजेरी लावली. ऑस्ट्रेलियाचे  8 गडी अवघ्या 63 धावांमध्ये आऊट झाले. त्यामुळे हातात आलेला सामना ऑस्ट्रेलियाने गमावला. इंग्लंडच्या सॅम करनने 35, जोफ्रा आर्चरने 34 आणि ख्रिस वोक्सने 32 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. 

क्रिकेटच्या सामन्यात पहिल्यांदाच मिळणार प्रेक्षकांना परवानगी  

दरम्यान, यापूर्वीचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी आपल्या खिशात घातला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 294 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा संघ 275 धावांवर सर्वबाद झाला होता. तर, आता तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बुधवारी 16 तारखेला मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. यासह दुसरा सामना इंग्लंडने जिंकून  मालिकेत 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी पुरेपूर ताकदीनिशी मैदानात उतरतील. 


​ ​

संबंधित बातम्या