जबर अर्धशतकी खेळीनं पाक कर्णधार बाबरची कोहली-फिंचच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

सुशांत जाधव
Sunday, 30 August 2020

इंग्लंड विरुद्धच्या 56 धावांच्या खेळीसह बाबरने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 1500 धावांचा टप्पा पार केला.

अनुभवी मोहम्मद हाफीज आणि कर्णधार बाबर आझमच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने 4 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावांपर्यंत मजल मारली. बाबरने या सामन्यात  44 चेंडूत 56) तर फखर झमानने 22 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. पहिला गडी स्वस्तात माघारी फिरल्यानंतर या जोडीने 72 धावांची उपयुक्ती खेळी केली. त्यानंतर हाफीजने 36 चेंडूत 69 धावांचे योगदान दिले. 

Chess Olympiad 2020 : इंटरनेट डिसकनेक्ट झालं अन् भारताला सुवर्ण मिळालं

बाबर आजमने अर्धशतकी खेळीनं भारतीय कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंच यांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. इंग्लंड विरुद्धच्या 56 धावांच्या खेळीसह बाबरने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 1500 धावांचा टप्पा पार केला. झटपट क्रिकेटमध्ये कमी डावात हा पल्ला गाठण्याचा पराक्रम बाबरने करुन दाखवला. असा पराक्रम करणारा तो तिसरा फलंदाज ठरलाय. यापूर्वी विराट कोहली आणि फिंच यांनी अशी कामगिरी नोंदवली होती. कोहली आणि फिंच दोघांनी  39 डावात 1500 धावांचा पल्ला गाठला होता. बाबरने देखील 39 डावातच हा टप्पा पार केला.  

कोरोनाच्या धास्तीमुळेच रैनाने घेतली IPL स्पर्धेतून माघार

इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. डोंगराऐवढी धावसंख्या उभारल्यानंतरही पाकिस्तानचा संघाला बॅकफूटवर ठेवण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला. यापूर्वी कसोटीमध्ये मजबूत कामगिरीनंतर पाकिस्तानने सामना गमावल्याचे पाहायला मिळाले होते. टी-20 मध्ये त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाल्याचे चित्रच पाहायला मिळाले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या