इंग्लंडच्या द्विशतकवीराचा मुंबई, पुण्यात सराव 

संजय घारपुरे
Wednesday, 26 August 2020

पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडला एक डाव राखून पाकिस्तानवर विजयाची संधी होती. मात्र पावसाच्या आगमनामुळे हा सामना देखील अनिर्णित राहिला.

मुंबई : पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडला एक डाव राखून पाकिस्तानवर विजयाची संधी होती. मात्र पावसाच्या आगमनामुळे हा सामना देखील अनिर्णित राहिला. तत्पूर्वी या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 583 धावांपैकी निम्म्या धावा केलेल्या जॅक क्रॉलीने 287 धावांची खेळी केली होती. जॅक क्रॉलीने तीन वर्षांपूर्वी मुंबई, पुण्यात फिरकी गोलंदाजांचा सामना केला होता. 

रोहित शर्माने पत्नी रितिकासह सुरु केला वर्कआऊट  

जॅकला फिरकी गोलंदाजी खेळण्याचा सराव होण्यासाठी त्याचे मार्गदर्शक रॉबर्ट की यांनी भारतात जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी ग्लोबल क्रिकेट स्कूलचे सचिन बजाज यांच्याशी संपर्क साधला. इंग्लंड क्रिकेट संघातील खेळाडूंचा भारतातील सराव आम्ही पाहतो. त्यामुळे त्यांनी संपर्क साधला आणि त्यावेळी म्हणजे 2017 मध्ये आम्ही सरावाची व्यवस्था केली. 

आता 'या' टेनिसपटूने घेतली यू.एस ओपनमधून माघार  

आम्ही त्यांचा सराव मुंबईत पारसी आणि हिंदू जिमखान्यावर घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी मुंबईतील नवोदित फिरकी गोलंदाजही उपलब्ध करून दिले, पण त्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये अचानक मुंबईत खूप पाऊस झाला, त्यामुळे आम्ही पुण्यातील दिलीप वेंगसरकर अकादमीवर सरावाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी त्याने सात-आठ तास फिरकी गोलंदाजांचा खेळण्याचा सराव केला होता, असे बजाज यांनी सांगितले. 

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण 

रॉबर्टस्‌ यांनीही या कसोटी दरम्यान मुलाखत देताना भारतात सराव केल्याचा क्रॉलीला फायदा झाला असल्याचे आवर्जून सांगितले. त्याला अनेकदा संधी मिळत नव्हती, त्यामुळे फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी भारतात सराव करण्याचे ठरवले व त्याचा फायदा झाला, असे त्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या