ENGvsPAK T20 : पाऊस जिंकला; इंग्लंड-पाक टी-20 सामना निकालाशिवाय थांबवण्याची नामुष्की!

सुशांत जाधव
Friday, 28 August 2020

कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ टी-20 मध्ये कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगलेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर टॉम बॅनटोनच्या 2 चेंडूतील 71 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 16.1 षटकात 6 बाद 131 धावा केल्या होत्या. यात जॉनी बेयरस्ट्रो (2) , डेविड मलन (23) कर्णधार इयोन मॉर्गन (14), मोईन अली (8), लेविस (2) धावा केल्या. सॅम बिलिंग्स 3 आणि क्रिस जार्डन 2 धावांवर नाबाद राहिले.  पावसाने खेळात व्यत्यय आणल्यानंतर हा सामना अनिर्णित राहिला.

पाकिस्तानकडून इमाद वासिम आणि शदाब खान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इफ्तहार अहमदलाही एक बळी मिळवण्यात यश आले. या सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व इयोन मॉर्गनच्या हाती आहे. तर पाकची कमान ही बाबर आझमकडे आहे. कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात रंगलेली हा पहिला टी-20 सामना आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत इंग्लंडचा संघ दुसऱ्या तर पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर आहे.  

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ टी-20 मध्ये कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे विजयी धडाका कायम ठेवून झटपट क्रिकेटमध्ये विजय मिळवण्याच्या इराद्यानेच यजमान प्रयत्नशील असतील. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यामुळे मालिका विजयासाठी दोन्ही संघाला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय प्राप्त करावा लागेल.  


​ ​

संबंधित बातम्या