इंग्लंड पाकिस्तानमध्ये खेळण्यास 'राज़ी'

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 16 October 2020

2009 पासून कसोटी खेळणारा कोणताही देश पाकिस्तान दोऱ्यासाठी तयार होत नव्हता. इंग्लंडचा संघाने आता दौऱ्यासाठी तयारी दर्शवली असून पाकिस्तान क्रिकेटसाठी ती एक मोठी पर्वणीच असेल.

England tour of Pakistan 2021 : कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत इंग्लंडमध्ये येऊन खेळणाऱ्या पाकिस्तानसोबत  घरच्या मैदानावर खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ राजी झालाय. इंग्लं क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान दौऱ्याचे निमंत्रण स्विकारले असून जानेवारीमध्ये इंग्लंडचा संघ पाकिस्तानमध्ये खेळताना दिसणार आहे.

कॅप्टन कुल धोनी आता बनतोय 'अँग्रीमॅन' 

2005 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टी-20 सामन्यांची मालिका खेळण्याची शक्यता आहे. दौऱ्यासंदर्भात अद्याप कोणतेही वेळापत्रक निश्चित झाले नसले तरी इंग्लंड पाकिस्तानमध्ये व्हाइट बॉल क्रिकेट खेळणार असल्याच्या वृत्ताला इंग्लंड बोर्डाने दुजोरा दिलाय. 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटचे मोठे नुकसान झाले.

गुगलचा काही नेम नाही ; शुभमनची पत्नी सर्च केल्यास दिसते सारा तेंडुलकर

श्रीलंकेसोबतच्या मालिकेनंच याठिकाणी पुन्हा क्रिकेट पर्व सुरु झाले. 2009 पासून कसोटी खेळणारा कोणताही देश पाकिस्तान दोऱ्यासाठी तयार होत नव्हता. इंग्लंडचा संघाने आता दौऱ्यासाठी तयारी दर्शवली असून पाकिस्तान क्रिकेटसाठी ती एक मोठी पर्वणीच असेल. यापूर्वी 2005-06 दरम्यान इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका असा मोठा दौरा केला होता. मार्कस यांनी वनडे टीमचे नेतृत्व केले होते. तर मायकल वॉगन यांनी कसोटी सामन्याचे नेतृत्व केले होते.  
 


​ ​

संबंधित बातम्या