ECB ने अति उत्साहात भारतासह इतर देशांचा केला अपमान ; अँडरसनच्या पायाखाली दाखवले राष्ट्रध्वज

टीम ई-सकाळ
Thursday, 27 August 2020

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत 600 बळींचा टप्पा पार केला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत 600 बळींचा टप्पा पार केला. जेम्स अँडरसनच्या या विक्रमानंतर क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे. अँडरसनच्या या कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेट मंडळाने देखील त्याचे कौतुक केले असून, अँडरसनच्या जागतिक कामगिरी संदर्भात सोशल मीडियावर ट्विट केले आहे. परंतु इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) केलेले हे ट्विट चुकीचे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.    

कोरोनाच्या संकटामुळे बॅडमिंटन जगतातील महत्वाच्या स्पर्धा रद्द 

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील तिसरा व अखेरचा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात इंग्लंडला एक डाव राखून पाकिस्तानवर विजयाची मोठी संधी होती. मात्र पावसाच्या आगमनामुळे सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशीचा काही वेळ वाया गेला होता. तर पाचव्या दिवशी  पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरु झाल्यावर पाकिस्तान संघाचा कर्णधार अझहर अली ३६ धावांवर असताना जेम्स अँडरसनने त्याला जो रूटकडे झेलबाद केले. व  या विकेट सोबतच अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 600 बळी मिळवत विक्रम रचला होता. जेम्स अँडरसनच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेक क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. 

अँडरसनच्या धमाकेदार कामगिरीनंतर युवराजने दिलं बुमराहला टार्गेट

यानंतर ईसीबीने देखील जेम्स अँडरसनचे कौतुक करणारी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली. आणि या पोस्ट मध्ये ईसीबीने कसोटी क्रिकेट मध्ये अँडरसनने प्रत्येक देशात जेवढ्या विकेट घेतल्या आहेत त्यांचा आकडा दिला आहे. पण हे करत असताना या पोस्ट मध्ये ईसीबीने जेम्स अँडरसनचे फोटो वापरले असून, त्याच्या फोटोत पायाखाली इतर सर्व देशांचे झेंडे दाखवले आहेत. यामध्ये भारताचा देखील झेंडा अँडरसनच्या पायाखाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ईसीबीने उत्साहाच्या भरात केलेल्या या अपमानजनक ट्विटवर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. तर काही जणांनी या ट्विटवर कंमेंट करताना ईसीबीवर टीका केली आहे. 

दरम्यान, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 600 बळींचा आकडा गाठलेले तिनही दिग्गज हे फिरकीपटू आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 600 गडी बाद करणारा अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे. श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 133 कसोटीमध्ये 800 गडी बाद करत पहिले स्थान मिळवले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट घेतल्या आहेत. व भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळेने 132 सामन्यात खेळताना 619 बळी टिपले आहेत. त्यामुळे अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे.            


​ ​

संबंधित बातम्या