क्रिकेट चाहत्याच्या कमेंटवर डीन जोन्स यांचा दिलखुलास रिप्लाय ठरला शेवटचा   

टीम ई-सकाळ
Thursday, 24 September 2020

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. जोन्स हे सध्या चालू असलेल्या आयपीएल स्पर्धेचे समालोचन मुंबईतून करत होते. यापूर्वी देखील जोन्स यांनी क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन उत्तमरीत्या केले होते. त्यामुळे ते जगभरासह भारतात देखील चांगलेच लोकप्रिय होते. तसेच ते समालोचनादरम्यान आपल्या परखड, स्पष्ट आणि नम्रपणामुळे ओळखले जात.   

डीन जोन्स हे आयपीएलच्या अधिकृत ब्रॉडकास्टर कॉमेंट्री पॅनेलचे भाग होते. त्यामुळे नुकतेच त्यांच्या समालोचनावर एका क्रिकेट चाहत्याने डीन जोन्स यांना सोशल माध्यमाच्या ट्विटरवर टॅग करत काहीतरी कमेंट्स केली होती. आणि या कमेंट वर डीन जोन्स यांनी रिप्लाय देत, तुम्ही समालोचन पाहत आहात त्याबद्दल आनंद आहे. व माझे समालोचन म्युट करुन सामना पहिला तरी चालेल, अशी मिश्किल कमेंट दिली होती. 

या सर्व घटनेनंतर अभिजित चौधरी नावाच्या क्रिकेट चाहत्याने डीन जोन्स यांना टॅग करत, तुम्ही त्या चाहत्याने केलेल्या कमेंटवर दुर्लक्ष करा. आणि आपण उत्तम समालोचन करत असल्याचे सांगत, तुम्हाला ऐकायला आवडत असल्याचे म्हटले होते. यानंतर डीन जोन्स यांनी देखील अभिजित चौधरीच्या या ट्विटला रिप्लाय देताना, ठीक आहे. मात्र लोकांना आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे लिहिले होते.       

दरम्यान, डीन जोन्स यांनी 1984 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले होते. व कसोटी प्रकारात ऑस्ट्रेलियाकडून 3,600 पेक्षा अधिक धावा आणि 6,000 पेक्षा जास्त धावा क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारात केल्या आहेत. याव्यतिरिक्त जोन्स यांना त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी म्हणून देखील ओळखले जात होते. तसेच जोन्स यांनी आपल्या कारकीर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये दोन दुहेरी शतके लगावले होते. ज्यात 1986 मध्ये चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे भारताविरुद्ध 210 धावांची मोठी खेळीचा समावेश आहे. जोन्स यांच्या जाण्यानंतर क्रिकेट विश्वातील सर्व दिग्गज क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे.       


​ ​

संबंधित बातम्या