दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमध्ये सरकारचा हस्तक्षेप; संघाला पुन्हा 'वनवास' भोगावा लागणार?

सुशांत जाधव
Friday, 11 September 2020

दक्षिण आफ्रिका संघाच्या संदर्भात तेथील सरकारने  घेतलेला हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या नियमात न बसणारा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना सरकारी हस्तक्षेपामुळे दक्षिण आफ्रिका संघावर  बंदीची कारवाई करु शकते.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघावर पुन्हा एकदा आयसीसीतून हद्दपार होण्याचे संकट घोंगावत आहे. दक्षिण आफ्रिकेतील सरकारने क्रिकेट संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. सरकारने दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ बरखास्त करुन क्रिकेटचा कारभार सरकारच्या नियंत्रणात घेतलाय. क्रिकबजच्या वृत्तानुसार,  दक्षिण आफ्रिका क्रीडा महामंडळ आणि ओलंपिक समितीने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून  सीएसए बोर्डाच्या (दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड)  वरिष्ठ अधिकाऱ्यांना  सीएसए प्रशासनावरुन हटण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

ब्रावोचा CPL-IPL चा 'तो' योगायोग जुळला तर यंदा युएईत धोनीच्या हातात दिसेल ट्रॉफी

दक्षिण आफ्रिका संघाच्या संदर्भात तेथील सरकारने  घेतलेला हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या नियमात न बसणारा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना सरकारी हस्तक्षेपामुळे दक्षिण आफ्रिका संघावर  बंदीची कारवाई करु शकते. याप्रकरणात आयसीसी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात वर्णभेदाच्या मुद्यावरुन दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठी किंमत चुकवावी लागली होती.  तब्बल 22 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने त्यांच्यावर बंदी घातली होती. क्रिकेटच्या सुरुवातीलच्या काळात दक्षिण आफ्रिकेचा संघ कृष्णवर्णीयांना संघात घ्यायचे बाजूला राहिले पण  त्यांच्याविरुद्द मैदानातही उतरायचा नाही. त्यामुळे हा संघ केवळ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यासोबत क्रिकेट स्पर्धा खेळण्यावर भर द्यायचा. 

#वर्णभेदाचा_खेळ : भेदभाव नडला अन् 22 वर्ष वनवास भोगला! 

1970 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या इंग्लंड दौऱ्याला परवानगीही मिळाली. पण या मालिकेला जोरदार विरोध करण्यात आला. वर्णभेदाच्या मुद्यावरुन आंदोलने झाली. त्यानंतर आयसीसीने दक्षिण आफ्रिका संघाला निलंबित केल्याची घोषणा केली होती.  1991 मध्ये नेल्सन मंडेला यांची तुरुंगात सुटका झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वनवासही संपुष्टात आला होता. 22 वर्षानंतर भारतासोबतच्या मालिकेने त्यांच्या क्रिकेटचे अच्छे दिन सुरु झाले. मात्र आता पुन्हा संघ अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या