विंडीज महिला संघाचे कोर्टनी वॉल्श मार्गदर्शक 

संजय घारपुरे
Friday, 2 October 2020

माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श यांची वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली.

पोर्ट ऑफ स्पेन : माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श यांची वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे एकदिवसीय तसेच ट्‌वेंटी 20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

बायर्न म्युनिचचे वर्षातील सलग पाचवे विजेतेपद 

तब्बल 132 कसोटी 519 विकेट घेतलेल्या वॉल्श यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेच्या वेळी संघास मार्गदर्शन केले होते. "महिला क्रिकेट संघाला मार्गदर्शन करण्याचे आव्हान अर्थातच आनंदाने स्वीकारले आहे. खेळाने, वेस्ट इंडिज क्रिकेटने मला खूप काही दिले. आता त्याची काही प्रमाणात परतफेड करण्याची संधी आली आहे. या निमित्ताने वेस्ट इंडिज क्रिकेटच्या प्रगतीस हातभार लागेल,'' असे त्यांनी सांगितले. त्यांनी एकदिवसीय सामन्यात 227 फलंदाज बाद केले आहेत. 

माझे खेळाचे ज्ञान, अनुभव तसेच संघटनात्मक कौशल्याचा संघाला नक्कीच फायदा होईल, ज्याद्वारे संघात सातत्याने विजयी होत असलेल्या संघासारखे वातावरण निर्माण होईल. यापूर्वी विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेच्या वेळी तसेच भारत दौऱ्याच्या वेळी संघासोबत काम केले आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल, असे वॉल्श यांनी सांगितले. 

बर्म्युडाचे हेम्प पाकिस्तानचे मार्गदर्शक 
ऑस्ट्रेलियातील ट्‌वेंटी 20 लीगमधील महिला संघांना मार्गदर्शन केलेल्या डेव्हिड हेम्प यांची पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचे मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मूळचे बर्म्युडाचे असलेले हेम्प सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. हेम्प हे पाकिस्तान महिला संघाचे दुसरे मार्गदर्शक. यापूर्वी न्यूझीलंडच्या मार्क कोल्स यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी कौटुंबिक कारणास्तव राजीनामा दिला होता.


​ ​

संबंधित बातम्या