अफगाणिस्तानातील बॉम्ब स्फोटात ICC पॅनलमधील अंपायरसह सात जणांचा मृत्यू  

टीम ई-सकाळ
Sunday, 4 October 2020

अफगाणिस्तान मध्ये झालेल्या मोठ्या बॉम्ब स्फोटात अंपायर सह सात अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

काबूल : अफगाणिस्तानमध्ये झालेल्या मोठ्या बॉम्ब स्फोटात अंपायरसह सात अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. शनिवारी  अफगाणिस्तानच्या नांगरहर प्रांतात झालेल्या बॉम्ब स्फोटात अफगाणिस्तानचे पंच बिस्मिल्लाह जान शिंवरी यांचा मृत्यू झाला आहे. शिंवरी यांनी आयसीसी संलग्नित 36 सामन्यासह एसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी केली आहे. 

देवदत्तची 'विराट' स्टोरी ; तेव्हा मेडल तर आज बॅटसोबत कोहलीची साथ!

अफगाणिस्तानमधील माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पूर्व प्रांतातील नानगढर प्रातांतील घाणीखिल जिल्ह्यातील जिल्हा गव्हर्नरच्या कंपाऊंडजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटात 15 जण ठार आणि 30 हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अजूनही कोणत्याच संघटनेने घेतलेली नसल्याची माहिती मिळत आहे. तर जिल्हा गव्हर्नर यांच्या इमारतीत शिरकाव करण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.     

भारतीय महिला संघाची ट्‌वेंटी-20 क्रमवारीत प्रगती 

या घटनेपुर्वी अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचा सलामीवीर नजीबुल्लाह तर्कई याचा शुक्रवारी अपघात झाला होता. नजीबुल्लाह रस्ता ओलांडताना त्याला एका कारने ठोकरले होते. त्यानंतर त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नाझीम झार अब्दुलरहीमझाई यांनी नजीबुल्लाह तर्कईची स्थिती नाजूक असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगितले आहे.       


​ ​

संबंधित बातम्या