वडिलांच्या निधनानंतर बीसीसीआयने सिराजला दिला आधार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले आहे. 

भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या मोहम्मद सिराजच्या वडिलांच्या निधनावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शोक व्यक्त केला आहे. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचे शुक्रवारी निधन झाले. सिराजचे वडील बर्‍याच दिवसांपासून फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासले होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज

संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी केली होती. याच सामन्याच्या एक रात्री अगोदर मोहम्मद सिराजच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोहम्मद सिराजची निवड झाली होती. शुक्रवारी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी सिराज सरावातून परत आल्यानंतर त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियात लागू करण्यात आलेल्या क्वारंटाईन नियमांमुळे मोहम्मद सिराजला भारतात परतणे शक्य नसल्याचे म्हटले जात होते. मात्र बीसीसीआयकडून सिराजला विमानाने परत भारतात येण्याची विचारणा करण्यात आल्याचे समजते.      

रोहित-विराट 'वाटणीवर'; कपिलपाजींचा 'कल्चर' स्ट्रोक

बीसीसीआयने सिराजच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्याशी संवाद साधत याबाबत बोलल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयने शनिवारी सिराजला ईमेल पाठवत, दु: खाच्या वेळी आपल्या कुटुंबासमवेत रहाण्यासाठी भारतात परतण्यासंदर्भात बोलल्याचे म्हटले आहे. परंतु यावेळेस मोहम्मद सिराजने संघासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयने सांगितले. 

दरम्यान, वडील गेल्याची बातमी मिळाल्यानंतर सिराजने राष्ट्रीय संघात खेळून देशासाठी खेळावे, अशी वडिलांची इच्छा होती. चांगली खेळी करुन त्यांचे स्वप्न पूर्ण करेन, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. तसेच वडील माझे खूप मोठे समर्थक होते. देशासाठी खेळून नाव करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या मनातील गोष्ट जाणून त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करु शकलो, असेही सिराज म्हणाला.     

 


​ ​

संबंधित बातम्या