बीसीसीआयचे सामनाधिकारी प्रसांता मोहपात्रा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सामनाधिकारी प्रसांता मोहपात्रा (वय ४७) यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले.

भुवनेश्वर - ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सामनाधिकारी प्रसांता मोहपात्रा (वय ४७) यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी राजेंद्र जडेजा या सौराष्ट्राच्या कर्णधार आणि सामनाधिकारी यांचेही निधन झाले होते.

उजव्या हाताने फलंदाजी करणारे मोहपात्रा १९९० ते २००३ या काळात ४५ रणजी सामने खेळले होते. पाच शतकांसह त्यांनी २१९६ धावा केल्या होत्या देशांतर्गत ४० सामन्यांत ते सामनाधिकारी होते. प्रसांता यांचे वडील रघुनाथ मोहपात्रा यांनाही कोरोनाची लागण झाली होती, नऊ दिवसांपूर्वी त्यांचेही निधन झाले होते.


​ ​

संबंधित बातम्या