बीसीसीआयची वार्षिक सभा लांबणीवर

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 September 2020

 बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्व संलग्न राज्य संघटनांना बैठक लांबणीवर पडल्याचे कळवले आहे. बीसीसीआयची तमिळनाडू सोसायटीची नोंदणी 1975 नुसार नोंदणी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या नियमामुसार 30 सप्टेंबर रोजी ही बैठक होणे आवश्‍यक असते.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाची सर्वांत महत्त्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर रोजी होणे अपेक्षित असते, ती यंदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही सभा ऑनलाइन घेणे अशक्‍य आहे. परिणामी लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

IPL 2020 : हिटमॅननंतर धोनीच्या भात्यातून उत्तुंग फटका (Video)

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्व संलग्न राज्य संघटनांना बैठक लांबणीवर पडल्याचे कळवले आहे. बीसीसीआयची तमिळनाडू सोसायटीची नोंदणी 1975 नुसार नोंदणी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या नियमामुसार 30 सप्टेंबर रोजी ही बैठक होणे आवश्‍यक असते.

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर तमिळनाडू राज्य सरकारने त्यांच्या राज्य सोसायटी कायद्यात हंगामी बदल केला आणि सप्टेंबर 2020 मध्ये अपेक्षित असलेली बैठक डिसेंबर 2020 पर्यंत लांबणीवर टाकण्याची मुभा दिली आहे, अशी माहिती शहा यांनी राज्य संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.  सोसायटी नोंदणीनुसार बैठक ऑनलाइनही होऊ शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

​ ​

संबंधित बातम्या