'आता बास करा'; नॅथन लियॉनने घेतली टीम इंडियाची फिरकी!

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 4 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा आणि चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन गाबा मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा आणि चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन गाबा मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ब्रिस्बेन येथील क्वीन्सलँड प्रशासने कोरोना संबंधित नियमांचे कठोरपणे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी या ठिकाणी रवाना झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. आणि ऑस्ट्रेलिया संघ यासाठी तयार असला तरी भारतीय संघ निर्बंधात वावरण्यासाठी राजी नसल्याचे प्रसारमाध्यमातील बातम्यातून समोर येत आहे. यावर आता ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने भारतीय संघाला तक्रार थांबवण्याचे आव्हान केले आहे. 

सिडनी येथील तिसरा कसोटी सामना झाल्यानंतर चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन पार पडणार आहे. त्यामुळे सिडनीतून ब्रिस्बेन येथे पोहचल्यानंतर पुन्हा दोन्ही संघांना काही दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. आणि यासाठी भारतीय संघ तयार नसल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियाच्या काही माध्यमांनी दिले आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने याबाबत भाष्य केले आहे. मागील सहा महिन्यांहून अधिक काळ दोन्ही संघातील खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात आहेत. मात्र आपल्या आवडता खेळ खेळण्यासाठी हा सगळ्यात लहान त्याग असल्याचे नॅथन लियॉनने म्हटले आहे. याशिवाय हा त्याग करून जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटविण्याचे आव्हान नॅथन लियॉनने केले आहे.          

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स मध्ये नॅथन लियॉन बोलत होता. यावेळी त्याने चौथ्या ब्रिस्बेन येथे होणाऱ्या कसोटी संदर्भात बोलताना, जैव-सुरक्षित वातावरण हे आपल्या दृष्टीने बरोबर असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही संघानी नियोजित ठिकाणी जाऊन अतिरिक्त विचार न करता कसोटी सामन्यासाठी शक्य तितक्या चांगल्या मार्गाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नॅथन लियॉनने व्यक्त केले आहे. त्यानंतर माध्यमांकडे जास्त लक्ष देऊ नये, असा सल्ला देखील नॅथन लियॉनने दिला आहे. आणि पुढे बोलताना, वैद्यकीय टीम कडून देण्यात येणार सल्ला ऐकून त्यानुसारच पुढे जाणे गरजेचे असल्याचे तो म्हणाला. त्यामुळे अधिक तक्रार न करता वैद्यकीय टीमच्या योजनेनुसारच पुढे जाणे गरजेचे असल्याचे नॅथन लियॉनने प्रेस कॉन्फरन्स सांगितले. 

दरम्यान, यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रॅड हेडिनने देखील अशाच काहीशा प्रकारचा उपदेश भारतीय संघाला दिला होता. भारतीय संघातील खेळाडू आयपीएल स्पर्धेपासून जैव सुरक्षित वातावरणात आहेत. जी परिस्थिती भारतीय खेळाडूंची आहे अगदी तसेच काहीसे ऑस्ट्रेलियन संघाचेही असल्याचे ब्रॅड हेडिनने म्हटले होते. पण भारतीय खेळाडूंना नियमानुसार खेळायला मैदानात उतरायचे नाही. आणि ऑस्ट्रेलियन संघाला नियमानुसार खेळण्यास तयार आहे, असेही ब्रॅड हेडिनने म्हटले होते. इतकेच नाही तर, भारतीय संघाला ब्रिस्बेनच्या मैदानावर पराभव दिसत असल्यामुळेच संघ याठिकाणी खेळण्यास तयार नाही, असा तर्क हेडिनने लावला होता.      


​ ​

संबंधित बातम्या