ENGvsAUS : स्टार्कचा जबऱ्या स्टार्ट; पहिल्या दोन चेंडूत दोन गड्यांना धाडले माघारी (Video)

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 16 September 2020

जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. जलदगती गोलंदाज स्टार्कने जेसनला आल्या पावली माघारी धाडले. मॅक्सवेलने त्याचा उत्तम झेल टिपला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या जो रुटलाही त्याने पायचित केले.

मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर  सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमानांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या वनडेत निसटलेला सामना खेचून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करणाऱ्या इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरला. पहिल्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर मिचेल स्टार्कने दोन बळी मिळवत यजमानांना अडचणीत आणले.  

ब्रावोचा CPL-IPL चा 'तो' योगायोग जुळला तर यंदा युएईत धोनीच्या हातात दिसेल ट्रॉफी

जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. जलदगती गोलंदाज स्टार्कने जेसनला आल्या पावली माघारी धाडले. मॅक्सवेलने त्याचा उत्तम झेल टिपला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या जो रुटलाही त्याने पायचित केले. आघाडीला बसलेल्या धक्क्यातून सावरत दुसऱ्या बाजूला असलेल्या बेयरस्टोने  कर्णधार इयॉन मॉर्गनच्या साथीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. या जोडीने 67 धावांची भागीदारी करत डाव सावरलाही. पण मॉर्गन एडम झम्पाच्या फिरकीत अडकला. त्याच्या रुपात इंग्लंडच्या संघाने तिसरी विकेट गमावली. स्टार्कने त्याचा झेल टिपला. मॉर्गनने  संघाच्या धावसंख्येत 23 धावांची भर घातली. झम्पाने बटलरला 8 धावांवर माघारी धाडत संघाला चौथे यश मिळवून देत इंग्लंडच्या संकटात आणखी वाढ केली. 19 षटकात संघाने 97 धावा केल्या होत्या.

IPL स्पर्धेत पहिला चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाचा हा विक्रम अद्यापही अबाधित!

दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचे इराद्याने मैदानात उतरले आहेत.  तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने बाजी मारली होती. अखेरचा सामना जिंकत पाहुण्या ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका सहजा-सहजी सोडणार नसल्याचे संकेत दिले. एकदिवसीय मालिकेत त्यांनी सुरुवातही विजयाने केली. पण दुसरा सामन्यातील पराभवानंतर आता टी-20 मालिका पराभवाची परतफेड करण्यात ते यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या