''भारतीय गोलंदाजांसमोर धावा करणे कठीण'' 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 5 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील  भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली असून, या सामन्यात टीम इंडियात काही बदल झालेले दिसणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील  भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली असून, या सामन्यात टीम इंडियात काही बदल झालेले दिसणार आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे पुनरागमन झाले आहे. एकदिवसीय सामन्याच्या वेळेस झालेल्या दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर टी-ट्वेन्टी आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अनुपस्थित राहिला होता. तर पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत विजय मिळवला होता. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. यावर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय गोलंदाजांना श्रेय देत, त्यांचे कौतुक केले आहे.  

AUSvsIND : टेस्ट मालिकेत न खेळताच लोकेश राहुल 'आउट'

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे काम केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला या दोन्ही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. यावर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी, आगामी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ ही चूक भरून काढण्यात यशस्वी होईल, असे म्हटले आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी अचूक आणि धारदार गोलंदाजी केल्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नसल्याची कबुलीच जस्टिन लँगर यांनी दिली.    

याशिवाय, आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत, त्याच दृष्टीने फिल्डींग लावल्याचे जस्टिन लँगर यांनी सांगितले. आणि यामुळे चेंडू व बॅट यांच्यातील जोरदार टक्कर पाहायला मिळाल्याचे सांगत, हीच कसोटी क्रिकेटची रंगत असल्याचे जस्टिन लँगर यांनी नमूद केले. याशिवाय भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर धावा करणे मोठे कठीण असल्याचे त्यांनी अधोरेखित करत, त्याला दुर्लक्ष करणे शक्य नसल्याचे मत जस्टिन लँगर यांनी व्यक्त केले. 

याव्यतिरिक्त, रविचंद्रन अश्विनचे कौतुक करताना असे किती गोलंदाज आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 380 हुन अधिक बळी मिळवल्याचे जस्टिन लँगर यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी अश्विन हा मोठा आव्हान असल्याचे जस्टिन लँगर यांनी म्हटले आहे. अश्विन व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह देखील घातक गोलंदाज असल्याचे जस्टिन लँगर यांनी सांगितले. त्यामुळे आगामी तिसऱ्या सामन्यासाठी फलंदाजांच्या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करत असून, भारतीय गोलंदाजांच्या विरोधात रणनीती आखात असल्याचे जस्टिन लँगर यांनी म्हटले आहे. 

कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेला व्हाईट वॉश 

दरम्यान, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या डे नाईट सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. आणि आता तिसरा सामना येत्या गुरुवारपासून खेळवण्यात येणार आहे. व शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.             


​ ​

संबंधित बातम्या