इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत अश्विनच्या सहा विकेट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 July 2021

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा एकत्रित सराव अजून सुरू व्हायचा आहे; पण फिरकी गोलंदाज अश्विनने सरावच काय, पण चांगला फॉर्मही मिळवला आहे. कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरे संघाकडून खेळताना त्याने दुसऱ्या डावात २७ धावांत सहा विकेट मिळविल्या.

लंडन - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा एकत्रित सराव अजून सुरू व्हायचा आहे; पण फिरकी गोलंदाज अश्विनने सरावच काय, पण चांगला फॉर्मही मिळवला आहे. कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरे संघाकडून खेळताना त्याने दुसऱ्या डावात २७ धावांत सहा विकेट मिळविल्या. पहिल्या डावात ४३ षटके गोलंदाजी केल्यावरही अश्विनला एकच विकेट मिळाली होती.

भारताच्या या प्रमुख फिरकी गोलंदाजाने या कौंटी सामन्यात दोन्ही डावात नव्या चेंडूने गोलंदाजी सुरू केली. सॉमरसेट संघाने पहिल्या डावात ४२९ धावांचा डोंगर उभा केला. त्यासमोर सरेचा संघ २४० धावाच करू शकला. अश्विन फलंदाजीत अपयशी ठरला. तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला.

दुसऱ्या डावातही सॉमरसेटचा संघ भक्कम फलंदाजी करणार, असा अंदाज होता; परंतु अश्विनच्या फिरकीसमोर त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 

अश्विनने आपल्या तिसऱ्याच षटकांत सॉमरसेटची सलामीची जोडी फोडली. त्यानंतर अश्विनने एकूण सहा विकेट मिळवले. त्यामुळे सरेचा संघ २९.१ षटकांत ६९ धावांतच गारद झाला. सॉमरसेटचे उर्वरित चार फलंदाज डॅनियल मॉरिट्री याने बाद केले.


​ ​

संबंधित बातम्या