भारत-लंका मालिकेतील सर्व लढती कोलंबोतच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 May 2021

भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या लढती खेळणार आहे. या दौऱ्यातील तीन एकदिवसीय तसेच तीन ट्वेंटी २० क्रिकेट लढती कोलंबोतच होणार आहेत.

कोलंबो - भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या लढती खेळणार आहे. या दौऱ्यातील तीन एकदिवसीय तसेच तीन ट्वेंटी २० क्रिकेट लढती कोलंबोतच होणार आहेत.

ही मालिका जैवसुरक्षित वातावरणात होईल, त्यामुळे संघांना जास्त प्रवास करणे भाग पडू नये यासाठी सर्व लढती प्रेमदासा स्टेडियमवरच घेण्याचा विचार करीत आहोत, असे श्रीलंका क्रिकेटच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख अर्जुना डिसिल्वा यांनी सांगितले. या दौऱ्यासाठी भारतीय संघ ५ जुलैला श्रीलंकेत दाखल होण्याची शक्यता आहे.

नियमानुसार भारतीय संघासाठी सुरुवातीचे तीन दिवस कठोर विलगीकरण असेल, त्यानंतर चार दिवस विलगीकरणात असताना सरावास मंजुरी असेल. सरकारने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्यास त्यानुसार विलगीकरण होईल, असेही डिसिल्वा यांनी स्पष्ट केले. त्यांनी इंग्लंड तसेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेच्या वेळी जैवसुरक्षित वातावरणाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी लष्कर तसेच आरोग्य मंत्रालयाची मदत घेतली होती असेही त्यांनी सांगितले.

दौऱ्याचा कार्यक्रम -
वनडे लढती - १३, १६, १९ जुलै.
ट्वेटी २० लढती - २२, २४, २७ जुलै.

भारताचे आघाडीचे खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे प्रामुख्याने मर्यादित षटकांच्या लढतीत खेळणारे खेळाडूच श्रीलंका दौऱ्यावर जातील. या संघाचे मार्गदर्शक पारस म्हाम्ब्रे असण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या