अँडरसनच्या धमाकेदार कामगिरीनंतर युवराजने दिलं बुमराहला टार्गेट

टीम ई-सकाळ
Wednesday, 26 August 2020

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत 600 बळींचा टप्पा पार केला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत 600 बळींचा टप्पा पार केला. जेम्स अँडरसनच्या या विक्रमानंतर क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील जेम्स अँडरसनचे ट्विटरद्वारे 600 कसोटी विकेट पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यानंतर बुमराहच्या या ट्विटवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने रिप्लाय दिला आहे. या रिप्लाय मध्ये युवराज सिंगने जसप्रीत बुमराहला 'तुझे लक्ष 400 आहे! किमान,' असे म्हटले आहे. 

आता 'या' टेनिसपटूने घेतली यू.एस ओपनमधून माघार  

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील तिसरा व अखेरचा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात इंग्लंडला एक डाव राखून पाकिस्तानवर विजयाची मोठी संधी होती. मात्र पावसाच्या आगमनामुळे सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशीचा काही वेळ वाया गेला होता. तर पाचव्या दिवशी  पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरु झाल्यावर पाकिस्तान संघाचा कर्णधार अझहर अली 36 धावांवर असताना जेम्स अँडरसनने त्याला जो रूटकडे झेलबाद केले. व  या विकेट सोबतच अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 600 बळी मिळवत विक्रम रचला होता. जेम्स अँडरसनच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेक क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. भारताच्या जसप्रीत बुमराहने देखील सोशल मीडियावरून जेम्स अँडरसनला कसोटी कारकिर्दीत लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले. शिवाय बुमराहने आपल्या ट्विट मध्ये अँडरसनला, आवड व धैर्य अपवादात्मक असल्याचे म्हणत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण 

तर, जसप्रीत बुमराहच्या अँडरसनला दिलेल्या शुभेच्छा ट्विटवर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने कमेंट केली आहे. ज्यामध्ये युवराज सिंगने  जसप्रीत बुमराहला प्रोत्साहन देताना, 'तुझे लक्ष 400 आहे! किमान,' असे लिहिले आहे. तसेच युवराज सिंगने आपल्या ट्विटमध्ये अँडरसनचे कौतुक केले आहे. आपल्या या ट्विटमध्ये युवराज सिंगने, आयुष्यात वेगवान गोलंदाज क्रिकेटच्या कसोटी प्रकारात 600 बळी घेताना पाहायला मिळेल याचा विचार देखील केला नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय येथे फक्त विकेटच्या संख्येबद्दलच नाही तर गुणवत्तेसह खेळल्याचे युवीने या ट्विट मध्ये नमूद केले आहे. व अँडरसनला विकेट हळू किंवा वेगवान, बाऊन्स असो वा नसो, स्विंग मिळो अथवा न मिळो या सगळ्यांचाच कधीही फरक पडलेला नसल्याचे लिहीले आहे. 

दरम्यान, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 600 बळींचा आकडा गाठलेले तिनही दिग्गज हे फिरकीपटू आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 600 गडी बाद करणारा अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे. श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 133 कसोटीमध्ये 800 गडी बाद करत पहिले स्थान मिळवले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट घेतल्या आहेत. व भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळेने 132 सामन्यात खेळताना 619 बळी टिपले आहेत. त्यामुळे अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे.                   


​ ​

संबंधित बातम्या