ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून क्रिकेटच्या मैदानात उतरली; अन्...(Video)

सुशांत जाधव
Sunday, 19 July 2020

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यलो जर्सीत येऊन ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाजांच्या चार एक चेंडूचा सामना केल्याचे तुमच्या लक्षात असेल.पण...

आमूक आमूक बॉलिवूड अभिनेत्रीनं घेतली तमूक तमूक क्रिकेटरची विकेट!.... यासारख्या मथळ्याखाली (हेडिंग) सजल्या-सजवलेल्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत वाचल्या असतील अन् ऐकल्याही असतील. क्रिकेट आणि बॉलिवूडकरांमधील ऋणानुंबध जूळून येती रेशीम गाठी प्रमाणेच असल्याचे आपण वेळोवेळी अनुभवत ही असाल. मग काळानुरुप त्यात बदल होताना दिसत असले तरी बऱ्याच दशकापासून चालत आलेली ही पारंपारिक मालिका सध्याच्या घडीलाही अखंड सुरुय...हे ही तुम्ही मान्य कराल. जेन्टलमन गड्यानं असं घायाळ अदाकारीसमोर बोल्ड वैगेरे होणं बरं नव्ह अस काहींच मतही निर्माण झालं असेल. पण आपल्याला तूर्तास त्यात डोकावायचं नाही तर क्रिकेटच्या मैदानात खरचं एखादीनं एखाद्या गड्याची कधी विकेट घेण्याचा पराक्रम करुन दाखवलाय का? या प्रश्नावर भर देत क्रिकेटच्या मैदानातील पुरुष विरुद्ध महिला यांच्यातील आमना-सामना झालेल्या लढतीला उजाळा द्यायचा आहे. 

हार्दिक-नताशाच्या फोटोवर चहल-राहुल जोडीची 'लव्हली' रिअ‍ॅक्शन

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यलो जर्सीत येऊन ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाजांच्या चार एक चेंडूचा सामना केल्याचे तुमच्या लक्षात असेल. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन गोलंदाज एलिस पेरी आणि तिची सहकारी असलेल्या अष्टपैलू अनाबेला यांच्या प्रत्येकी दोन-दोन चेंडूचा सामना केल्याचे पाहायला मिळाले होते. पुरुष क्रिकेटमध्ये देवाची उपमा लाभलेल्या विक्रमादित्याला महिला गोलंदाजांनी टाकलेले चेंडू हा क्रिकेटच्या मैदानातील एक अविस्मरणीय असा प्रसंग होता. अशा प्रकारचा सामना पाहायला मिळण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी जवळपास 25 वर्षांपूर्वी क्रिकेटच्या मैदानात सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडणारा प्रसंग घडला होता.

चलो दुबई...जुळवाजुळव सुरु

18 डिसेंबर 1994 मध्ये एका चॅरीटी सामन्यात हजारोच्या संख्येनं भरलेल्या स्टेडियममध्ये महिला क्रिकेटर चक्क मिनी स्कर्टवर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. तिने या सामन्यात फलंदाजी अन् गोलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी करुन दाखवत अष्टपैलू कामगिरीही नोंदवली होती. तिने ज्या दोन विकेट घेतल्या होत्या त्यात तत्कालीनच नव्हे सर्वकालीन महान फलंदाजामध्ये ज्या दिग्गजाचे नाव घेतले जाते त्या ब्रायन लाराच्या विकेटचा यात समावेश होता. सिडनीच्या मैदानात ब्रॅडमन इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन यांच्यात रंगलेल्या चॅरिटी सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू झो गॉस हिची अखेरच्या क्षणाला संघात वर्णी लागली होती. वर्ल्ड इलेव्हनच्या संघात ब्रायन लारा, सुनील गावसकर, David Gower डेव्हिड गोवेर आणि जोएल गॉर्नर , यासारखी दिग्गज मंडळी मैदानात उतरली होती. ब्रॅडमन

बीसीसीआयला 4800 कोटीचा फटका?

इलेव्हनमध्ये संघात सहभागी होण्याची तिची कहाणीही अफलातून अशीच आहे. पर्थमधील आपल्या घरात असताना झोए गॉसच्या घरातील टेलिफोन खणाणला. पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ओळखत असल्याचे तिला वाटले. तोपर्यंतच लोकप्रिय क्रिकेटर आणि समालोचक टोनी ग्रेग यांनी आपली ओळख करुन देत झोएला बॅग पॅक करुन सिडनी गाठायला सांगितले होते. एससीजीच्या मैदानात होणाऱ्या चॅरिटी सामन्यात ब्रॅडमन इलेव्हन संघात स्थान मिळणे झोएच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण होता. मैदानात उतरल्यानंतर लारा सारख्या दिग्गजाची विकेट घेऊन तिने स्वत:कडेच नाही तर महिला क्रिकेटकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यावेळी लाराच्या नावे कसोटीत 375 आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 501 धावांच्या विश्विविक्रमाची नोंद होती. त्यामुळे झोएनं घेतलेली विकेट सर्वांसाठीच एक भन्नाट अनुभव देऊन जाणारी होती. लाराची विकेट घेतल्यानंतर ती खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. त्या सामन्याने माझ्या आयुष्याला एक वेगली कलाटणी मिळाली, असे तिने एका मुलाखतीमध्ये देखील सांगितले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या