दक्षिण आफ्रिकनं क्रिकेटमध्येही खळबळ: सात जण कोरोनाच्या जाळ्यात, पण...

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 June 2020

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आतापर्यंत खेळाडू स्टाफ आणि इतर कर्मचारी मिळून जवळपास शंभर जणांची तपासणी केली आहे. यामध्ये फ्रेंचायजीशी जोडलेल्या सदस्यांचाही समावेश होता.

कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या संक्रमणानंतर जगभरातील विविध देशात खेळाच्या मैदानात पुन्हा उतरण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात खबरदारी घेत एका बाजूला स्पर्धा पुन्हा सुरु करण्यास सुरुवात झाली असताना खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. टेनिस कोर्ट, फुटबॉलच्या मैदानातील खेळाडूंना कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याच्या वृत्तानंतर पाकिस्तान संघातील इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज असलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. पाकिस्तानसोबतच दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या अडचणीही वाढल्याचे दिसत आहे. बोर्डाने मोठ्या प्रमाणात चाचण्या घेणं सुरु केल्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी सलग्न असलेल्या सात जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिलाय. तसेच यातील कोणाचेही नाव जाहीर करणार नसल्याचेही स्पष्ट केलय.

इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज पाक संघातील तिघांना कोरोना; पुढे काय ऐकायला मिळणार?

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आतापर्यंत खेळाडू स्टाफ आणि इतर कर्मचारी मिळून जवळपास शंभर जणांची तपासणी केली आहे. यामध्ये फ्रेंचायजीशी जोडलेल्या सदस्यांचाही समावेश होता. दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यातील शिथिलतेनंतर खेळाडूंना सरावासाठी सुट दिली आहे.  सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक्स फॉल यांनी 'स्पोर्ट्स 24 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तपासणी केलेल्यामधील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगताना त्यांनी या प्रकरणातील नावे जाहीर करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. 100 जणांच्या चाचणीनंतर 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा आकडा अधिक नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.

युवा क्रिकेटर्संना या गोष्टीची शिकवण द्या, सॅमीची आयसीसीला विनंती 

जगभरात 90 लाखापेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार मुर्तजा, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीसह अन्य तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील कोणता खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकला आहे का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.    


​ ​

संबंधित बातम्या