भारत-पाक सामन्याचा थरार पुन्हा अनुभवता येणार

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आता पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना भारत-पाक लढतीचा आस्वाद लुटता येणार आहे. 

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या प्रत्येक सामन्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. भारतीय संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानावर सहज विजय मिळवत पुन्हा एकदा त्यांच्यावर वर्चस्व गाजवले. भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आता पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना भारत-पाक लढतीचा आस्वाद लुटता येणार आहे. 

हाँगकाँगच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सुपर फोर गटाचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान ही लढत केवळ औपचारिकता होती. तरीही चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दल नेहमीप्रमाणेच प्रचंड उत्सुकता होती. अ गटातून भारत आणि पाकिस्तान तर, ब गटातून बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघाचा सुपर फोर गटातील प्रवेश निश्चित आहे.

त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोर गटात 23 सप्टेंबरला आणखी एक सामना होणार हे नक्की आहे. 

आशिया करंडकातील सुपर फोरमधील सामने पुढीलप्रमाणे :

21 सप्टेंबर- भारत विरुद्ध बांगलादेश, पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान
23 सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश
25 सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
26 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
28 सप्टेंबर- अंतिम सामना


​ ​

संबंधित बातम्या