#क्रिकेट_डायरी: द्रविडची षटकाराची हॅट्रिक अन् 4 चेंडूत 92 धावांची कहाणी खरी की खोटी? 

टीम ई-सकाळ
Sunday, 28 June 2020

# क्रिकेट_डायरी या हॅशटॅगच्या माध्यमातून आपण या लेखातून अशा घटनांना उजाळा देणार आहोत की त्या ऐकल्यानंतर कदाचित ती अफवा असल्याचे तुम्हाला वाटेल. पण

मुंबई : क्रिकेट हा खेळ जगभरातील मोजक्या राष्ट्रात खेळला जात असला तरी त्याची लोकप्रियता ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आता अमेरिकेलाही क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे वेध लागले आहेत. आयसीसीच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमान पदासाठी अमेरिकेने उत्सुकता दाखवल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच चर्चेचा विषयच ठरली होती. या चर्चेवरुन क्रिकेटच्या लोकप्रियता किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे लक्षात येते. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या खेळात अनेक अशक्यप्राय विक्रम घडतात. काही खेळाडूंच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाचीही नोंद होते. अगदी तसेच क्रिकेटमध्ये काही मुद्यावरुन तुफान अफवाही पसरल्याचे पाहायला मिळते. 2003 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर त्या सामन्यात धमाकेदारी शतकी करणाऱ्या तत्कालीन कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्पिंगा असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. रिकीची ती इनिंग आश्चर्यचकित करुन सोडणारी होती त्यामुळेच कदाचित त्याच्या बॅटमध्ये स्पिंगा असल्याचे बोलले गेले. अशा अन्य काही घटनाही क्रिकेटच्या मैदानात घडल्या आहेत. # क्रिकेट_डायरी या हॅशटॅगच्या माध्यमातून आपण या लेखातून अशा घटनांना उजाळा देणार आहोत की त्या ऐकल्यानंतर कदाचित ती अफवा असल्याचे तुम्हाला वाटेल. पण क्रिकेटच्या मैदानात त्या घटना घडल्या आहेत.  

शोएबनं सानियाच्या डोळ्यादेखत केल माहिराशी फ्लर्ट; मग काय चर्चा तर होणारच

भारतीय संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी लागोपाठ तीन षटकार मारलेत, असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला क्रिकेटमधील काही कळत नाही, असे म्हणाला. याच कारण राहुल द्रविड शांत आणि संयमी खेळी करताना आपण पाहिलं आहे. 508 सामन्यात राहुल द्रविड यांच्या खात्यात केवळ 66 षटकार आहेत. हवेत चेंडू खेळण्याची अ‍ॅलर्जी असावी, असे त्यांची खेळी पाहताना वाटायचे. पण इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या एकमेव टी-20 सामन्यात लागोपाठ तीन षटकार खेचण्याचीही आपल्यात क्षमता असल्याचे राहुल द्रविड यांनी दाखवून दिले होते.  इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानात झालेल्या सामन्यात भारताच्या डावातील 11 व्या षटकात समित पटेलच्या गोलंदाजीवर राहुल द्रविड यांनी सलग तीन षटकार खेचले होते. द्रविड यांनी या तीन चेंडूत केलेली खेळी जगातील क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारी अशीच होती. 

4 चेंडूत 92 धावांची कहाणी

क्रिकेटच्या मैदानात एका षटकात किती धावा होऊ शकतात? असा प्रश्न जर कोणी विचारला तर याच उत्तर सर्व वैध चेंडूवर जास्तीत जास्त 36 धावा करता येतील असे देता येईल. आता यात नो बॉल आणि व्हाइडच्या स्वरुपात षटक लांबले तर याहूनही अधिक धावा होऊ शकतात. क्रिकेटच्या मैदानात 4 चेंडूत 92 धावा झाल्याचा किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. खरं तर ही गोष्ट अफवा वाटावी अशीच आहे. पण हे खरं आहे. बांगलादेशमधील ढाकाच्या मैदानात लालमाटिया क्लब आणि एक्सिम क्रिकेटर्स या दोन संघात झालेल्या सामन्यात लालमाटिया क्लबचा संघ निर्धारित 50 षटकांच्या सामन्यात 14 षटकात 88 धावांत आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ एसलेल्या एक्सिम क्रिकेटर्स क्लबने अवघ्या 4 चेंडूत 92 धावा केल्या होत्या. लालमाटिया क्लबकडून खेळणाऱ्या सुजोन या गोलंदाजाने आपल्या पहिल्या षटकात 13 वाइड आणि 3 नो बॉल फेकले. ज्यावर प्रत्येकी चार प्रमाणे 80 धावा मिळाल्या. या गोलंदाजाने जे चार चेंडू चांगले टाकले त्यावर मुस्ताफिजुर रहिमान या सलामीच्या फलंदाजाने तीन चौकार खेचत संघाला विजय मिळवून दिला होता. या प्रकारानंतर लालमाटिया क्लबवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली होती. तसेच प्रशिक्षक, मॅनेर आणि कर्णधार यांच्यावर पाच वर्षांची तर गोलंदाजावर 10 वर्षांच्या बंदीची कारवाई झाली होती.  

जिममध्ये जायचय? अगोदर हे वाचा 

गिल्लीने मैदानात काही तरी वेगळ केलं अन् ते जगाने पाहिलं पण....

2007 च्या विश्वचषकात भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात फायनल मुकाबला झाला. यष्टिरक्षक आणि सलामीचा फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला होता.  या सामन्यात गिलख्रिस्टने 149 धावांची स्फोटक खेळी केली होती. शतक पूर्ण केल्यानंतर अ‍ॅडम गिलख्रिस्टने आपल्या बॅटसह ग्लव्जही दाखवले. त्यामध्ये काहीतरी वस्तू ठेवल्याचे दिसत होते. बॅटला ग्रीप यावी या हेतूने ग्लव्जमध्ये  स्कवॉश बॉल ठेवल्याचे खुद्द गिल्लीने सांगितले होते. ही चिडखोरवृत्ती असल्याची त्याच्यावर टिका झाली. श्रीलंकन बोर्डाने याप्रकरणात आयसीसीकडेही दाद मागितली. पण या कृत्यामध्ये गिल्लीला अडचणीत आणणारा नियम क्रिकेटच्या नियमावलीत नसल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.  


​ ​

संबंधित बातम्या