ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, चेंडूमुळे कोरोना पसरण्याचा धोका, पण..

टीम ई-सकाळ
Wednesday, 24 June 2020

कोरोनाची खबरदारी म्हणून क्रिकेटमध्ये जे निर्बंध घातले आहेत ते हटवण्यात येणार नाहीत. मात्र 8 जूलैपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील द्विपक्षीय मालिकेवर कोणतेही संकट येणार नाही, असा विश्वास ब्रिटनच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.

लंडन : वेस्ट इंडिज-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे स्थगित झालेल्या क्रिकेट पर्व पुन्हा एकदा नव्याने सुरु होणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात प्रेक्षकाविना रंगणारी ही पहिली आणि ऐतिहासिक मालिका ठरणार आहे. दोन्ही संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले असून या मालिकेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असा विश्वास ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी व्यक्त केलाय. द्विपक्षीय मालिकेबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करताना क्रिकेटमधील चेंडूमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.  

मदतीसाठी कोर्टवर उतरले अन् जोकोविचसह 'हे' टेनिस स्टार कोरोनाच्या जाळ्यात अडकले

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात 8 जूलैपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील कानाकोपऱ्यात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा क्रिकेटलाही फटका बसला आहे. भारतातील आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिजसोबत द्विपक्षिय मालिका खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला. या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहात पंतप्रधान बोरिस यांच्यासमोर खासदार ग्रेक क्लार्क यांनी क्रिकेटमधील निर्बंधासंबधात प्रश्न उपस्थितीत केला होता. 

'द्रविड हा सचिन-गांगुलीपेक्षा भारी होता'

कोरोनाची खबरदारी म्हणून क्रिकेटमध्ये जे निर्बंध घातले आहेत ते हटवण्यात येणार नाहीत. मात्र 8 जूलैपासून होणाऱ्या मालिकेवर कोणतेही संकट येणार नाही, असे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून क्रिकेटची मैदाने ओस पडली आहेत. इंग्लंडमधील कसोटी मालिकेनं क्रिकेटचा खेळ पुन्हा रंगणार आहे. जॉनसन म्हणाले की, सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये निर्माण झालेली समस्या सर्वज्ञात आहे. क्रिकेटमध्ये चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी थूंकीचा वापर झाल्यास कोरोना विषाणूचा धोका संभवण्याची शक्यता आहे. आम्ही वैज्ञानिकांच्या संपर्कात असून क्रिकेट कोविड-मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सध्याच्या घडीला क्रिकेटमधील निर्बंधामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात द्विपक्षीय मालिकेला परवानगी देण्यात आली असली तरी बोरिस जॉनसन सरकारने लॉकडाउनच्या काळात काउंटी क्रिकेटवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. खेळ पुन्हा सुरु करण्यासंदर्भात काउंटी बोर्ड सरकारशी चर्चा करत आहेत. यात पार्श्वभूमीवर त्यांनी क्रिकेटमील चेंडूमुळे कोरोना प्रसाराचा धोका संभवतो असे सांगितले.   
 


​ ​

संबंधित बातम्या