#वर्णभेदाचा_खेळ : या खेळाडूच्या प्रतिस्पर्धी बोर्डानेच दुखावल्या होत्या भावना

टीम ई-सकाळ
Sunday, 7 June 2020

2013-14 च्या अ‍ॅशेस मालिकेती दुसऱ्या कसोटीत मोन्टी पानेसरला संघात स्थान मिळाले. यावेळी मैदानातील खेळाडू किंवा प्रेक्षक नाही तर चक्क क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन मोठी चूक झाली.

अमेरिकेतील आफ्रिकन वंशीय जॉर्ज फ्लॉयडच्या निर्दयी मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्यावरुन वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच अनुषंगाने #वर्णभेदाचा_खेळ या हॅशटॅगच्या माध्यमातून आपण खेळाच्या मैदानात घडलेल्या भेदभावाच्या घटनांना उजाळा देत आहोत. जोफ्रा आर्चर, भज्जी सायमंड यांच्यातील वादानंतर आज आपण इंग्लंडच्या ताफ्यातील कमालीची कामगिरी करणारा फिरकीपटू मोन्टी पनेसरच्या बाबतीत घडलेल्या घटनेला उजाळा देणार आहोत.  

#वर्णभेदाचा_खेळ : साहेबांच्या ताफ्यातील हा प्रतिभावंत खेळाडूही दुखावलाय

2013-14 च्या अ‍ॅशेस मालिकेती दुसऱ्या कसोटीत मोन्टी पानेसरला संघात स्थान मिळाले. यावेळी मैदानातील खेळाडू किंवा प्रेक्षक नाही तर चक्क क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन मोठी चूक झाली. या ट्विट अकाउंटवरुन पगडी आणि दाढी असलेल्या चार शीखांची प्रतिमा पोस्ट करण्यात आली होती. कृपया यातील खरा मोंन्टी पानेसरने उभे रहावे! या कॅप्शनसह हे ट्विट करण्यात आले होते. हा प्रकार वर्णभेदावर भाष्य करणारा असाच होता. यामुळे मॉन्टी पानेसर आणि चाहत्यांच्याच नव्हे तर शीख समुदायातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. आपली चूक लक्षात आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माफीही मागितली होती.

पाकच्या या क्रिकेटरला टीम इंडियाच्या ताफ्यासोबत फिरायचंय

2006 मध्ये मॉन्टीने भारताविरुद्ध नागपूरच्या मैदानातून आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती. इंग्लंडच्या ताफ्यातील सर्वोत्तम फिरकीपटूच्या यादीत त्याचा समावेश होतो. मॉन्टी पानेसरने इंग्लंडकडून खेळताना तीन वेळेस भारत दौरा केला आहे. यात त्याने १७ विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला २०१२ साली २-१ अशी मात दिली होती. तब्बल २७ वर्षांनंतर इंग्लंडच्या संघाने भारतीय संघावर भारतात मात केली होती. 


​ ​

संबंधित बातम्या