क्रिकेट ऑस्ट्रेलिया होणार आत्मनिर्भर...वाचा कसे ते

टीम ई-सकाळ
Thursday, 2 July 2020

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्ण आत्मनिर्भर होण्याचे ठरवले आहे. त्यांनी आपल्या क्रिकेटमधील ब्रिटीश घुसखोरी दूर करताना इंग्लंडमधील ड्यूक्स चेंडूऐवजी देशात तयार होणाऱ्या कुकाबुरा चेंडूंना राष्ट्रीय स्पर्धेत अर्थात शेफिल्ड ढाल स्पर्धेत पसंती दिली आहे.

कॅनबेराः क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्ण आत्मनिर्भर होण्याचे ठरवले आहे. त्यांनी आपल्या क्रिकेटमधील ब्रिटीश घुसखोरी दूर करताना इंग्लंडमधील ड्यूक्स चेंडूऐवजी देशात तयार होणाऱ्या कुकाबुरा चेंडूंना राष्ट्रीय स्पर्धेत अर्थात शेफिल्ड ढाल स्पर्धेत पसंती दिली आहे.

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण : बीसीसीआयचे भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रमुख म्हणतात...   

क्रिकेट ऑस्ट्रेलिया 2016 पासून ड्युक्स हे इंग्लंडमध्ये निर्माण होत असलेले चेंडू वापरत होते. ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये इंग्लंडमध्ये पराजित झाल्यानंतर तत्कालीन कर्णधार रिकी पाँटिंगने ही सूचना केली होती. कुकाबुराच्या तुलनेत ड्युक्सचे चेंडू जास्त स्विंग होतात; तसेच टणक राहतात, याकडे लक्ष वेधले होते. त्या वेळी कुकाबुराचे चेंडू चांगले नसल्याचे अनेकांचे मतही होते.

कोरोना संक्रमित भागाला नोवाक जोकोविचची मदत 

ऑस्ट्रेलिया तसेच वेस्ट इंडिजमध्ये वापर होत असलेले ड्युक्स चेंडू इंग्लंडमध्ये वापरले जात असलेल्या चेंडूपेक्षा जास्त टणक होते. गतवर्षी शेफिल्ड ढालमध्ये ड्युक्स तसेच कुकाबुरा हे दोन्ही चेंडू वापरण्यात आले होते. कुकाबुरा चेंडू हे ड्युक्सच्या तोडीस तोड असल्याचे मत खेळाडूंनी व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलने तर दोन इंग्लंड दौऱ्यात खूपच अंतर असते, त्यामुळे सातत्याने ड्युक्स चेंडूचा वापर कशाला, अशी विचारणा केली.


​ ​

संबंधित बातम्या