CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील गड्याचा बोलबाला!

सुशांत जाधव
Thursday, 6 August 2020

कॅरेबियन लीगमध्ये लक्षवेधी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत डेविड वाइस, रेमन रायफर, शाकिब अल हसन, फिडेल एडवर्ड्स,  सोहिल तनवीर, डीजे ब्रावो या मंडळींचा समावेश होता.

वेस्ट इंडीज संघातील अष्टपैलू आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नईच्या ताफ्यात असलेला डीजे ब्रावोने कॅरेबियन लीगमध्ये विशेष छाप सोडली आहे. आतापर्यंत झालेल्या हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम हा ब्रोवोच्या नावे आहे. त्याने या स्पर्धेत 69 सामन्यात 97 बळी टिपले आहेत. कॅरेबियन लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडीज संघाकडून टी-20 सामन्यात प्रतिनिधीत्व करणारा जमेकाचा क्रिकेटर क्रिश्मर संतोकी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 80 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. विंडीज देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅकोचं नेतृत्व केलेल्या रायड एमरितने 76 गड्यांची शिकार केली आहे.

#IPLचा मागोवा : देशी 'थप्पड' अन् परदेशी खेळाडूंनी गाजली होती स्पर्धा

2015 च्या हंगामात ब्रावोने 13 सामन्यात 28 बळी टिपले होते. एका हंगामात एखाद्या गोलंदाजाने केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. गोलंदाजीमध्ये एका सामन्यात केवळ 6 धावा खर्च करुन 6 बळी मिळवण्याचा पराक्रम बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या नावे आहे. कॅरेबियन लीगमधील ही सर्वोच्च कामगिरी आहे.

IPL 2020: 53 दिवसांची स्पर्धा; पहिल्यांदाच 'वर्किंग डे'ला रंगणार 'फायनल'

कॅरेबियन लीगमध्ये लक्षवेधी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत डेविड वाइस, रेमन रायफर, शाकिब अल हसन, फिडेल एडवर्ड्स,  सोहिल तनवीर, डीजे ब्रावो या मंडळींचा समावेश होता. या गोलंदाजांनी एका सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. याशिवा राशिद खान आणि मोहम्मद हाफिज यांनी अनुक्रमे  5.82 आणि 5.83 सरासरीस उत्तम गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या