CPL2020: बारबाडोस ट्रिडेंट्स व सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स सामन्यात बारबाडोस ट्रिडेंट्स विजयी 

टीम ई-सकाळ
Wednesday, 19 August 2020

बारबाडोस ट्रिडेंट्स आणि सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स यांच्यात झालेल्या सामन्यात बारबाडोस ट्रिडेंट्स संघाने विजय मिळवला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे क्रिकेट जगतातील लीगच्या सामन्यांना देखील स्थगित करण्याची वेळ आली होती. त्यानंतर आता काल मंगळवारपासून कोरोनाच्या विषाणूवर खबरदारी घेत क्रिकेट मधील लीगला सुरुवात झाली आहे. मागील महिन्याच्या जुलै पासून विंडीज आणि इंग्लंडच्या कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरवात झाली आहे. कोरोनाच्या काळानंतर कालपासून चालू झालेली कॅरेबियन प्रीमियर लीग ही क्रिकेट जगतातील पहिली लीग ठरली आहे. 

...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर   

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेली  त्रिनिबागो नाइट राउडर्स (Trinbago Knight Riders) आणि 5 वेळा अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेल्या गुयाना अमेझॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) यांच्यातील सामन्याने स्पर्धेला काल सुरुवात झाली. त्यानंतर आज बारबाडोस ट्रिडेंट्स आणि सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स यांच्यात झालेल्या सामन्यात बारबाडोस ट्रिडेंट्स संघाने विजय मिळवला आहे. बारबाडोस ट्रिडेंट्सने प्रथम फलंदाजी करत, 9 गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा केल्या. तर बारबाडोस ट्रिडेंट्सने दिलेल्या 153 धावांचा पाठलाग करताना 20 षटकांमध्ये 147 धावाच केल्या. त्यामुळे बारबाडोस ट्रिडेंट्सने 6 धावांनी सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाचा पराभव केला. बारबाडोस ट्रिडेंट्स संघाकडून फलंदाजी करताना होल्डरने सर्वात अधिक 38 धावा केल्या. तर सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघातील डी सिल्वाने सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या.    

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड  

बारबाडोस ट्रिडेंट्स आणि सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स यांच्यातील सामन्यानंतर जमेका थलावाज आणि सेंट लुसिया जॉक्स यांच्यातील सामना सुरु असून, या सामन्यात सेंट लुसिया जॉक्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमावत 158 धावा केल्या आहेत. त्यानंतर फलंदाजीला उतरलेला जमेका थलावाजने 16 व्या षटकापर्यंत 4 गडी गमावत 126 धावा केलेल्या आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या