CPL2020 : गोलंदाजीतील कमालीचा विक्रम नाइट रायडर्सच्या नावे, पाहा व्हिडिओ

सुशांत जाधव
Saturday, 8 August 2020

तीनवेळा जेतेपद पटकावणाऱ्या संघाच्या नावे लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. कॅरेबियन लीगमध्ये या संघाने आतापर्यंत 523 बळी टिपले आहेत. सध्याच्या घडीला हा संघ सर्वात मजबूत संघापैकी एक आहे.

कॅरेबियन लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आणि सर्वाधिक तीन वेळा या स्पर्धेचे जेतपद पटवण्याचा पराक्रम हा त्रिनबगो नाइट रायडर्स या संघाच्या नावे आहे. 2013 पासून कॅरेबियन लीगला सुरुवात झाली. पहिल्या हंगामात जमेका थलायवाजने जेतेपद पटकावले. 2014 चा हंगाम बारबाडोस ट्रायडेंट्सने गाजवला. त्यानंतर त्रिनिदाद अँण्ड टोबगो रेड स्टील (सध्याचा त्रिनबगो नाइट रायडर्स) आणि पुन्हा जमेका थलायवाजनंतर 2017 मध्ये त्रिनबगो नाइट रायडर्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. आयपीएलमधील नाइट रायडर्सशी कनेक्शन असलेल्या संघाने 2018 मध्ये तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगाम गाजवून जेतेपदाचा चौकार खेचण्याच्या इराद्यानेच संघ मैदानात उतरेल.

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

तीनवेळा जेतेपद पटकावणाऱ्या संघाच्या नावे लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. कॅरेबियन लीगमध्ये या संघाने आतापर्यंत 523 बळी टिपले आहेत. सध्याच्या घडीला हा संघ सर्वात मजबूत संघापैकी एक आहे. केरेन पॉलार्डच्या नेतृत्वाखाली सुनील नरेन, ड्वेन ब्रावो, लेंडल सिमन्स आणि भारताचा फिरकीपटू प्रविण तांबे या मंडळींचा सहभाग आहे. यंदाच्या हंगामातील प्रमुख दावेदार असलेल्या संघापैकी त्रिनबगो नाइट रायडर्स हा एक संघ आहे.  

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गड्याचा बोलबाला

नाइट रायडर्सच्या ताफ्यात सामन्याच्या चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. ड्वेन ब्रावो, केरन पोलार्ड,लेंडल सिमन्स, सुनील नरेन या गड्यांमध्ये अष्टपैलू खेळी करण्याची ताकद आहे. कॉलीन मुन्रो, टीम सिफर्ट फटकेबाजीत माहिर आहेत. मागील हंगामात सिमन्स हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. तर पोलार्ड पाचव्या स्थानावर होता. ही जोड गोली अन् कॉलीन मुन्रो आणि इतर मंडळींना सूर गवसला तर यंदाच्या हंगामात नाइट रायडर्स जेतेपदाचा चौकार खेचत कॅरेबियन लीगमध्ये आपलाच विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित करु शकते. भारत भारत भारत भारत  क्रिकेट 
 


​ ​

संबंधित बातम्या